Video: लॉकडाऊनमुळे Ajinkya Rahane आनंदी; पत्नीकडून शिकतोय नवी Recipe

अजिंक्य रहाणेनं या लॉकडाऊनचा प्लस पॉईंट सांगितला आणि तो सर्वांना पटण्यासारखा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 03:56 PM2020-04-11T15:56:10+5:302020-04-11T15:56:43+5:30

whatsapp join usJoin us
Video: Ajinkya Rahane happy with lockdown; New Recipe learning from wife svg | Video: लॉकडाऊनमुळे Ajinkya Rahane आनंदी; पत्नीकडून शिकतोय नवी Recipe

Video: लॉकडाऊनमुळे Ajinkya Rahane आनंदी; पत्नीकडून शिकतोय नवी Recipe

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. 14 एप्रिलला लॉकडाऊनचा काळ संपत असला तरी यात आणखी दोन आठवड्यानी वाढ होण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींनी त्यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची विनंती केली. लॉकडाऊनमुळे क्रीडा स्पर्धाही रद्द झाल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंना घरीच रहावे लागत आहे. या लॉकडाऊनमुळे भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आनंदी आहे. बीसीसीआयनं शनिवारी अजिंक्य रहाणे या लॉकडाऊनच्या काळात काय करतोय, याबाबतचा व्हिडीओ पोस्ट केला. त्यात अजिंक्यनं त्याचा रुटीन सांगितला.

तो म्हणाला,''लॉकडाऊनच्या काळात तुझा डेली रुटीन काय असतो, असे मला अनेक जण विचारतात. मी तुम्हाला तो सांगतो. सकाळी आर्या उठण्यापूर्वी मी व्यायाम करतो. मी पुन्हा कराटेचा सराव सुरू केला आहे. तुम्हा सर्वांना माहीत असेलच की मी लहानपणी कराटे ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. आठवड्यात 3-4 वेळा मी कराटेचा सराव करतो. आर्या उठल्यानंतर मी तिचा सांभाळ करतो.''

'' या लॉकडाऊनचा एक प्लस पॉईंट आहे की, मला आर्यासोबत पुरेसा वेळ घालवायला मिळतो. क्रिकेट दौऱ्यांमुळे मला तिला वेळ द्यायला मिळत नाहीत. त्यामुळे लॉकडाऊनमुळे मी आनंदी आहे, की मला आर्यासोबत खेळायला मिळतय. आर्या पुन्हा झोपल्यावर मी पत्नी राधिकाला जेवण बनवण्यात किंवा साफ सफाई करण्यात मदत करतो. राधिकाकडून नवी रेसिपी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.''
पाहा व्हिडीओ...



 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

ग्लेन मॅक्सवेल अन् भारतीय मुलीची Untold Love Story; अशी पडली ऑसी खेळाडूची विकेट!

मोठी बातमी : भारताच्या क्रिकेटपटूनं झोपेतच घेतला अखेरचा श्वास

'दादा'ला कडक सॅल्यूट; कोरोनाच्या संकटात Sourav Gangulyचं लाखमोलाचं समाजकार्य!

Corona Virusनं भारताच्या अम्पायरला झाडावर चढवले; नेमके काय घडले?

देशात Lockdown, तरीही Ms Dhoni, R Ashwin च्या अकादमीतर्फे प्रशिक्षण सुरूच

Corona Virus : विराट कोहलीपाठोपाठ RCBचा मदतीचा हात; सैन्य, आरोग्य सेवकांसाठी मोठा निर्णय

Video : शोएब अख्तरचा प्रताप; नेटिझन्सकडून होतोय जोरदार ट्रोल

Web Title: Video: Ajinkya Rahane happy with lockdown; New Recipe learning from wife svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.