IPL Auction 2021 : महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन ( Arjun Tendulkar) आता इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) १४व्या पर्वात मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians) खेळणार आहे. गुरुवारी चेन्नईत पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावात MIनं अर्जुनला २० लाखांच्या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. अर्जुनला संघात घेण्याच्या निर्णयाचे मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक माहेला जयवर्धने ( Mahela Jayawardene ) यानं समर्थन केलं. अर्जुनची निवड ही पूर्णपणे कौशल्याच्या आधारावर ( purely on a skill basis) झाल्याचं जयवर्धनेनं स्पष्ट केलं. अर्जुन तेंडुलकरच्या कौशल्याचं आकाश अंबानीकडून कौतुक; झहीर म्हणतो, तो मेहनती मुलगा!
२१ वर्षीय अर्जुन तेंडुलकरनं मुंबईच्या सीनियर संघाकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 स्पर्धेत हरयाणाविरुद्ध पदार्पण केलं. या स्पर्धेत दोन सामन्यांत त्यानं दोन विकेट्स घेतल्या. पण, लिलावाच्या ३-४ दिवस आधी त्यानं मुंबईत सुरू असलेल्या पोलिस ढाल क्रिकेट स्पर्धेत ( Police Shield Cricket Tournament ) एमआयजी क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करताना २६ चेंडूंत ७७ धावा चोपल्या आणि त्यात ८ षटकार व ५ चौकारांचा समावेश होता. २१ वर्षीय अर्जुननं गोलंदाजीतही कमाल दाखवली आणि ४० धावा देत ३ विकेट्सही घेतल्या. तुझा अभिमान वाटतो भावा; अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, सारानं लिहिली पोस्ट...
''अर्जुन तेंडुलकरची निवड ही पूर्णपणे त्याच्या कौशल्यावर केली गेली आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा हा टॅग त्याच्यावर लागला आहे, परंतु नशिबानं तो गोलंदाज आहे, फलंदाज नाही. त्यामुळे अर्जुनसारखी गोलंदाजी करता आल्यास सचिनलाही अभिमान वाटेल. अर्जुन तेंडुलकरसाठी ही लर्निंग प्रक्रिया आहे. त्यानं नुकतंच मुंबईसाठी खेळायला सुरुवात केली आहे आणि आता तो फ्रँचायझीकडून खेळणार आहे. तो अजून युवा आहे आणि त्याला बरंच काही शिकायचं आहे. त्याला आम्ही पुरेसा वेळ देणार आहोत आणि त्याच्यावर दबाव आणणार नाही. ''
मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians Full Squad)
रिटेन खेळाडू : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रु णाल पंड्या, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक आदित्य तारे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, क्रि स लिन, मोहसिन खान आणि अनमोलप्रीत सिंग
लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- नॅथन कोल्टर नायर ( Nathan Coulter-Nile) ५ कोटी, अॅडम मिल्ने ( Adam Milne) ३.२ कोटी, पीयूष चावला ( Piyush Chawla) २.४ कोटी, जेम्स निशम ( James Neesham) Rs 50 lakh, युधवीर चरक ( Yudhvir Charak) २० लाख, मार्को जॅन्सेन ( Marco Jansen) २० लाख, अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) २० लाख