Video : फुकट काम करेन, फक्त पाकिस्तानातील लोकांना रेशन पुरवा; शाहिद आफ्रिदीचे आवाहन

पाकिस्तानातील कोरोना रुग्णांची संख्या 5716वर गेली असून 96 लोकांचा मृत्यू झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 12:43 PM2020-04-14T12:43:23+5:302020-04-14T12:46:59+5:30

whatsapp join usJoin us
Video : Avail my services for free, give ration in return for people of Pakistan: Shahid Afridi tells brands svg | Video : फुकट काम करेन, फक्त पाकिस्तानातील लोकांना रेशन पुरवा; शाहिद आफ्रिदीचे आवाहन

Video : फुकट काम करेन, फक्त पाकिस्तानातील लोकांना रेशन पुरवा; शाहिद आफ्रिदीचे आवाहन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 19लाख 26,235 वर पोहोचली आहे. त्यापैली 1 लाख 19, 724 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर 4 लाख 52, 326 रुग्ण बरे झाले आहेत. अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. पाकिस्तानातील गरजूंसाठी शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन काम करत आहे. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदीच्या फाऊंडेशननं आतापर्यंत 5 हजाराहून अधिक गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या आहेत. पण, आता आफ्रिदीनं पाकिस्तानातील गरजूंना मदत करण्यासाठी जाहिरातदारांना आवाहन केलं आहे. आफ्रिदीनं जाहिरातदारांना फुटक काम करेन, त्या मोबदल्यात पाकिस्तानातील गरजूंना रेशन पुरवा, असं आवाहन केलं.

आफ्रिदीनं एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात तो म्हणाला,''अनेक ब्रँड्ससोबत जाहीराती/प्रमोशनमध्ये काम केले आहे. आता मी कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी काम करत आहे. त्यामुळे मी आता ब्रँड्ससमोर एक प्रस्ताव ठेवतो. मी त्यांच्यासाठी फुकट काम करण्यास तयार आहे. त्यांनी केवळ पाकिस्तानातील जनतेसाठी शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनला रेशन आणि निधी द्यावा.'' 

''तुम्ही सर्व ठिक आहात, अशी आशा व्यक्त करतो. मी काम केलेल्या ब्रँड्सना एक आवाहन करू इच्छितो. माझ्या देशासाठी मी ब्रँड्ससमोर मोफत काम करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. त्या मोबदल्यात ब्रँड्सनी देशातील गरजूंना रेशन पुरवावं,'' असं आफ्रिदी म्हणाला. 
 

पाहा व्हिडीओ...

शाहिद आफ्रिदीचं भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना प्रत्युत्तर
कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर पुढे आले आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीनं या संकटाशी सामना करण्यासाठी सरकारला मदत करत आहे.  याच संकटाशी मुकाबला करण्यासाठी भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिकेचे आयोजन करून निधी गोळा करावा, असा प्रस्ताव पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं ठेवला होता.  तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतून जमा होणारा निधी दोन्ही देशांत समासमान वाटप केला जावा, असा प्रस्ताव अख्तरनं ठेवला होता.

त्याच्या या प्रस्तावाचा भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी चांगलाज समाचार घेतला. भारताला पैशांची गरज नाही, त्यामुळे खेळाडूंचा जीव धोक्यात घालण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत भारताचे वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव यांनी मांडले. शोएब अख्तरवर टीका होताना पाहून पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदी पुढे आला. त्यानं कपिल देव यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यावर आफ्रिदीनं प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला,''शोएब अख्तरनं मानवतेच्या दृष्टीनं तो प्रस्ताव ठेवला होता. कपिल देव यांच्या विधानानं मला धक्का बसला, कारण मी असे व्हिडीओ पाहतोय की भारतातील लोकं कचऱ्याच्या डब्ब्यातून अन्न गोळा करत आहेत आणि खात आहेत. कपिल देव यांनी ते विधान करायला नको होतं.'' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक; Corona Virus मुळे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू जाफर सर्फराजचा मृत्यू

भारतातील लोकांना कचऱ्यातून अन्न निवडून खाताना पाहतोय; शाहिद आफ्रिदीनं ओलांडल्या मर्यादा

युवराज सिंगला मदत केली, तेव्हा पाकिस्तानातून टीका झाली नाही; शाहिद आफ्रिदीचा भारतीयांना टोमणा

Video: बेबी, मै क्या हू तेरा? हार्दिक पांड्यानं प्रेयसी नताशाला विचारला सवाल अन्...

Web Title: Video : Avail my services for free, give ration in return for people of Pakistan: Shahid Afridi tells brands svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.