VIDEO:श्रीलंकेच्या गोलंदाजासमोर बाबर आझम चितपट; अवघ्या १६ धांवावर उडला त्रिफळा

सध्या श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 05:19 PM2022-07-25T17:19:33+5:302022-07-25T17:20:38+5:30

whatsapp join usJoin us
VIDEO: Babar Azam Chitpat in front of Sri Lankan bowler; Triphala flew in just 16 runs | VIDEO:श्रीलंकेच्या गोलंदाजासमोर बाबर आझम चितपट; अवघ्या १६ धांवावर उडला त्रिफळा

VIDEO:श्रीलंकेच्या गोलंदाजासमोर बाबर आझम चितपट; अवघ्या १६ धांवावर उडला त्रिफळा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

PAK vs SL । गॉले : श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील दुसरा सामना गॉले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात ३७८ धावा केल्या आहेत. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी पाकिस्तानच्या संघाने आपल्या डावाची सुरूवात निराशाजनक केली. संघाचा प्रमुख फलंदाज आणि कर्णधार बाबर आझमला श्रीलंकेच्या गोलंदाजाने आपल्या जाळ्यात फसवले आणि अवघ्या १६ धावांवर त्याचा त्रिफळा उडवला. 

बाबर बाद झाल्याने पाकिस्तानच्या संघाला मोठा झटका बसला, मात्र श्रीलंकेच्या संघाने सामन्यात मजबूत पकड बनवली. बाबर सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे त्यामुळे त्याला तंबूत पाठवल्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांना सुटकेचा श्वास घेता आला. श्रीलंकन फिरकीपटू प्रभात जयसूर्याने (Prabhat Jayasuriya) बाबरचा त्रिफळा उडवून माघारी पाठवले. 

जयसूर्यासमोर बाबर फेल
जयसूर्याच्या फिरकीसमोर पाकिस्तानच्या कर्णधाराला हार मानावी लागली. बाबर त्याची लय पकडत असतानाच जयसूर्याने आपल्या फिरकीने पाकिस्तानच्या संघाची डोकेदुखी वाढवली. १० वे षटक घेऊन आलेल्या जयसूर्याने स्टंप आणि लाइनमध्ये अचूक टाकलेला चेंडू सरळ आला आणि ड्राइव्ह मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या बाबरचा त्रिफळा उडाला. बाबरला अपेक्षा होती तेवढा चेंडू बाहेर न निघल्याने तो बाद झाला. अतिशय खराब पद्धतीने बाद झाल्यानंतर बाबरच्या चेहऱ्यावर नाराजी पाहायला मिळाली. 


 
श्रीलंका मजबूत स्थितीत

श्रीलंकेच्या संघाने दुसऱ्या दिवसाची सुरूवात केली होती. श्रीलंकेच्या संघाने ६ गडी गमावून ३१५ धावांची आघाडी घेतली आहे. निरोशन डिकवेला आणि दुनिथ वेलालागेने श्रीलंकेच्या डावाला पुढे नेले. डिकवेलाने ५४ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. तर यजमान संघाकडून दिनेश चंडिमलने सर्वाधिक ८० धावा करून संघाला मजबूत स्थितीत पोहचवण्यात हातभार लावला. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि यासीर शाह यांनी प्रत्येकी ३-३ बळी पटकावले. 

SL vs PAK Sri Lankan spinner Prabhat Jayasuriya clean bowled Pakistan captain Babar Azam
 

Web Title: VIDEO: Babar Azam Chitpat in front of Sri Lankan bowler; Triphala flew in just 16 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.