दुबई - विरेंद्र सेहवागचा मराठा अरेबियन्स आणि आफ्रिदीच्या पख्तुन्वा या संघात टी -10 लीगमधील सामना रंगला. पख्तून्स टीमचा कर्णधार असलेल्या शाहिद आफ्रिदीने सेहवागची विकेट घेताच काल झालेल्या पहिल्या सामन्यात आपली हॅट्रिक साजरी केली. आपल्या पहिल्याच टी-10 सामन्यात हॅट्रिक घेणारा आफ्रिदी पहिलाच खेळाडू बनला आहे. शाहिद आफ्रिदीच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर मराठा अरेबियन्सचा पख्तून्स 25 धावांनी पराभव केला. आफ्रिदीनं पाचव्या षटकात रोसोऊ, ड्वेन ब्रावो आणि कप्तान वीरेंद्र सहवागला बाद करत हॅट्ट्रिक केली. प्रथम फलंदाजी करताना पख्तून संघानं दहा षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 121 धावा केल्या होत्या. 122 धावांचा पाठलाग करताना सेहवागच्या मराठा अरेबियन्सनला दहा षटकांत 96 धावांपर्यंतच मजल मारु शकला.
क्रिकेटच्या मैदानात कालपासून (गुरुवार) टी-10 लीगच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. टी-20 सामन्याची लोकप्रियता पाहता या नव्या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आयोजकांना आशा आहे. टेन क्रिकेट लीग नावाने या स्पर्धेला सुरुवात झाली असून, 14 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत 6 संघ सहभागी आहेत. तीन दिवसात 10 षटकांचे 13 सामने खेळवण्यात येणार आहेत. सर्व सामने शारजाच्या मैदानात रंगणार आहेत.
टी20 आणि टी10 मध्ये पदार्पणात बाद होणारा सेहवाग पहिलाच खेळाडू -
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि समालोचक वीरेंद्र सेहवागच्या नावावर काल क्रिकेटमध्ये एक नकोसा असा विक्रम जमा झाला आहे. ज्या क्रिकेट प्रकारासाठी सेहवाग विशेष करून ओळखला जातो त्याच मर्यादित षटकांच्या परंतु नव्याने सुरु झालेल्या टी10 प्रकारात पहिल्याच सामन्यात तो 0 धावांवर बाद झाला आहे. 39 वर्षीय सेहवाग हा या लीगमध्ये मराठा अरेबियंस टीम संघाचा कर्णधार आहे. त्याची काल खेळाडू आणि कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना होता. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला सेहवाग आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. 2003 मध्ये सेहवाग लेसिस्टरशायरकडून 16 जून 2003 रोजी जो टी20 सामना खेळला होता त्यातही ० धावेवर बाद झाला होता. तेव्हा यॉर्कशायरच्या क्रिस सिल्वरवुडने सेहवागला बाद केले होते.
उभय संघ -
मराठा अरेबियन्स- वीरेंद्र सेहवाग (कर्णधार ), मोहम्मद आमिर, मोहम्मद शमी, इमाद वासिम, कामरान अकमल, शैमान अन्वर, जहूर खान, अॅलेक्सहेल, रॉस व्हायटली, लेंडल सिमंस, रिल रोसॉवू, हार्डर व्हिलजोएन, कृष्मार संतोकी, ड्वेन ब्रावो, रेवोलोफ, वान डेर मेरवे.
पख्तुन्वा- शाहिद आफ्रिदी (कर्णधार), फखर झमान, अहमद शहजाद, ज्यूनिद खान, सोहेल खान, उमर गुल, मोहम्मद इरफान, शाहिन आफ्रिदी, ड्वेन स्मिथ, लीमन डेवसन, तमीम इक्बाल, नजीबुल्लाह झदरान, मोहम्मद नबी, अमजद जावेद, शकलेन हैदर.
Web Title: VIDEO: 'Boom Boom' ..... Afridi Kelly Hatrick after doing Sehwag
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.