Video : "चहल भाई को पता नही क्या दुख है..."; दारूच्या नशेत दिसला युझवेंद्र? नीट चालताही येत नव्हतं

भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal) आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 07:06 PM2023-04-29T19:06:56+5:302023-04-29T19:07:21+5:30

whatsapp join usJoin us
Video : "Chahal Bhai Ko Pata Nahi Kya Dukh Hai..."; RR bowler yuzvendra-chahal-seen-drunk-viral-video-unable-to-walk-properly, Video  | Video : "चहल भाई को पता नही क्या दुख है..."; दारूच्या नशेत दिसला युझवेंद्र? नीट चालताही येत नव्हतं

Video : "चहल भाई को पता नही क्या दुख है..."; दारूच्या नशेत दिसला युझवेंद्र? नीट चालताही येत नव्हतं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal) आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. राजस्थान रॉयल्सच्या या गोलंदाजाने सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये आघाडी मिळवली आहे. त्याची टीमही चांगली कामगिरी करत आहे. चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवल्यानंतर संघाने गुणतालिकेतही अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे ते प्लेऑफमध्येही पोहोचतील हे निश्चित दिसते. दरम्यान, चहलचा एक व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे.


व्हायरल व्हिडिओमध्ये चहल दारूच्या नशेत असल्याचा दावा केला जात आहे.  त्याच्यासोबत चालणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावर त्याने हात ठेवला आहे. तिच व्यक्ती गाडीचे दार उघडून त्याला ड्रायव्हरच्या शेजारी बसवले आहे. कारमध्ये बसूनही चहल अस्वस्थ दिसत आहे. कारच्या विंडशील्डवर मुंबई इंडियन्सचा लोगो चिकटवण्यात आला आहे.


मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही तो उपस्थित असल्याचा दावा केला जात आहे. त्याच पार्टीतून बाहेर पडताना हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. पण, चहलने मद्यप्राशन केले होते का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही, परंतु  सोशल मीडियावर तशी चर्चा रंगली आहे. 


चहलने आतापर्यंत 8 सामन्यात 12 फलंदाजांना बाद केले आहे.  पर्पल कॅप मिळवण्यापासून फक्त दोन विकेट्स दूर आहे.

Web Title: Video : "Chahal Bhai Ko Pata Nahi Kya Dukh Hai..."; RR bowler yuzvendra-chahal-seen-drunk-viral-video-unable-to-walk-properly, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.