पोर्ट ऑफ स्पेन: वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेईल अशी चर्चा रंगली होती. मात्र गेलने भारताविरुद्धच्या मालिकेनंतर निवृत्त होणार असं गेल देखील म्हणाला होता. परंतु बुधवारी झालेल्या सामन्यानंतर त्याला निवृत्तीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, पण गेलने दिलेल्या त्या प्रश्नाच्या उत्तराने सर्वांनाच धक्का बसला आहे.
टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून बुधवारी झालेल्या तीसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवून तीन वन डे सामन्यांची मालिकासुद्धा 2- 0 अशा फरकाने जिंकली. तसेच तिसरा वन डे सामना ख्रिस गेलचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दमधील शेवटचा सामना आहे असे सर्वांना वाटले होते. परंतु सामन्यानंतर त्याला विचारण्यात आलेल्या निवृत्तीबद्दलच्या प्रश्नावर ''मी अजुन निवृत्ती जाहीर केलेली नाही. पुढच्या नोटीसीपर्यंत मी खेळत राहीन'' असं उत्तर दिल्याने सर्व क्रिकेटपटूंना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
तसेच 39 वर्षीय गेलने आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये 1999 साली भारता विरुद्धच पदार्पण केले होते. गेलने 301 वन डे सामन्यात 10480 धावा केल्या आहे. यामध्ये त्याने 25 शतक आणि 54वे अर्धशतक झळकाविले आहे. गेलने आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये 1999मध्ये भारताच्या विरुद्धच पदार्पण केले होते.