India vs Australia 4th Test: ड्रिक्स ब्रेकमध्ये इशान किशनकडून झाली चूक; रोहित शर्माने ते पाहिलं अन्...;पाहा मजेशीर Video

India vs Australia 4th Test:भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील एक मजेशीर व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 05:48 PM2023-03-09T17:48:25+5:302023-03-09T17:53:20+5:30

whatsapp join usJoin us
Video circulating on social media shows India's captain Rohit Sharma behaving inappropriately with his teammate Ishan Kishan | India vs Australia 4th Test: ड्रिक्स ब्रेकमध्ये इशान किशनकडून झाली चूक; रोहित शर्माने ते पाहिलं अन्...;पाहा मजेशीर Video

India vs Australia 4th Test: ड्रिक्स ब्रेकमध्ये इशान किशनकडून झाली चूक; रोहित शर्माने ते पाहिलं अन्...;पाहा मजेशीर Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु कसोटी मालिकेतील (IND vs AUS 4th Test) शेवटचा आणि निर्णायक सामना आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु झाला आहे. सामन्यात पहिल्या दिवशीचा खेळ आटोपला असून ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत स्थितीत दिसून येत आहे. २५५ धावा कागांरुंनी करत केवळ ४ विकेट्सच गमावले आहेत. उस्मान ख्वाजा शतक ठोकून फलंदाजी करत असून कॅमरुन ग्रीनही चांगल्या लयीत आहे. तर भारताकडून जाडेजा आणि अश्विन प्रत्येकी १ तर शमीने दोन विकेट्स घेतल्या. 

ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस नावावर ठेवला. सलामीवीर उस्मान ख्वाजा भारतीय गोलंदाजांसमोर शड्डू ठोकून उभा राहिला आहे. आर अश्विन व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवून दिली. मोहम्मद शमीने दोन भन्नाट चेंडूंवर ऑसी फलंदाजांचे त्रिफळे उडवले. मार्नस लाबुशेन व पीटर हँड्सकोम्ब यांना भारतीय गोलंदाजाने त्रिफळाचीत केले. कर्णधार स्टीव्ह स्मिथने अनुभवी खेळी केली आणि कॅमेरून ग्रीनने वन डे स्टाईल फटकेबाजी करताना ऑस्ट्रेलियाची पहिल्या दिवसावरील पकड अधिक मजबूत केली. 

या सामन्यातील एक मजेशीर व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सामन्यादरम्यान ड्रिंक्स ब्रेक सुरु होता. यावेळी भारतीय संघाचा फलंदाज इशान किशन पाण्याची बॉटल घेऊन आला आणि रोहित शर्माला ती बॉटल दिली. पाणी पिऊन झाल्यानंतर रोहितने ती बॉटल पुन्हा इशान किशनकडे दिली. मात्र इशान किशनच्या हातातून ती बॉटल निसटली आणि खाली पडली. ती बॉटल इशान किशन उचलताना रोहितने त्याला मस्तीत मारण्याची अॅक्शन केल्याचे व्हिडिओमधून दिसून येत आहे.

दरम्यान कॅमेरून ग्रीन व ख्वाजा यांनी झटपट धावा जोडताना ८० चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. दिवसाचा खेळ संपायला ९ षटकं बाकी असताना रोहितने नवा चेंडू मागवला. पण, शमीच्या एका षटकात ग्रीनने दोन खणखणीत चौकार खेचले. ख्वाजा शतकाच्या उंबरठ्यावर असतानाही संयमानेच खेळत होता, तर ग्रीन चांगले फटके खेचत होता. नव्या चेंडूनंतर विकेट मिळतील असे वाटले होते, परंतु कांगारूंनी ६च्या सरासरीने धावा चोपल्या. पहिल्या दिवसाच्या अखेरच्या षटकात ख्वाजाने त्याचे शतक पूर्ण केले. भारताविरुद्धचे हे त्याचे पहिले शतक ठरले, तर एकंदर १४ वे कसोटी शतक झळकावले. 

Web Title: Video circulating on social media shows India's captain Rohit Sharma behaving inappropriately with his teammate Ishan Kishan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.