Join us  

Video : 2020 मधील पहिला वादग्रस्त निर्णय? तुम्हीच ठरवा फलंदाज Out की Not Out!

बिग बॅश लीग ट्वेंटी-20त गुरुवारी आश्चर्यकारक झेल पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 3:39 PM

Open in App

बिग बॅश लीग ट्वेंटी-20त गुरुवारी आश्चर्यकारक झेल पाहायला मिळाला. हॉबर्ट हरिकेन्स आणि ब्रिस्बन हिट यांच्यातल्या सामन्यात हा प्रसंग घडला. मॅट रेनशॉ आणि टॉम बँटन यांनी सुरेख ताळमेळ राखताना झेल टिपला, परंतु त्यान सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. हरिकेन्स संघाचा कर्णधार मॅथ्यू वेडनं बेन कटिंगच्या गोलंदाजीवर दमदार फटका मारला, परंतु सीमारेषेवर रेनशॉनं चेंडू टिपला. त्यानंतर काय घडलं ते पाहूया...

प्रथम फलंदाजीला आलेल्या हरिकेन्स संघाचे पाच फलंदाज 59 धावांत माघारी पाठवून हिट संघानं सामन्यावर पकड घेतली होती. कर्णधार वेड एकाबाजूनं खिंड लढवत होता. त्यानं 46 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकार खेचून 61 धावांची खेळी केली. त्याला थॉमस रॉजर्स ( 17) आणि नॅथन एलिस ( 13*) यांनी छोटेखानी खेळी करून साथ दिली. डावाच्या 15 व्या षटकात वेड वादग्रस्तरित्या बाद झाला.

त्यानं टोलावलेला चेंडू रेनशॉनं सीमेनजीक टिपला, परंतु त्याचा तोल गेला आणि त्यानं तो पुन्हा हवेत उडवला. त्यानंतरही चेंडू सीमारेषेपार जात असतानाचे दिसताच रेनशॉनं पुन्हा हवेत झेप घेतली आणि चेंडू मैदानावर असलेल्या बँटनच्या दिशेनं टोलावला. बँटननं झेल टिपला. पंचांनी वेडला बाद दिले, परंतु त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

पाहा व्हिडीओ...

नियमानुसार वेड बाद आहे... काय आहेत नियम जाणून घ्या...

 

टॅग्स :टी-20 क्रिकेटआयसीसीसोशल व्हायरल