India vs New Zealand, 1st Test : मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) कानपूर कसोटीत पदार्पण करताना १०५ धावांची खेळी केली. कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या या शतकाच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात ३४५ धावा केल्या. शुबमन गिल व रवींद्र जडेजा यांनीही अर्धशतकी खेळी केली. लोकेश राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे अय्यरला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. श्रेयसच्या या शतकी खेळीनंतर हिटमॅन रोहित शर्मा ( Rohit Sharma) यानं अनोख्या पद्धतीनं अभिनंदन केलं. रोहितनं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय...
४ बाद २५८ धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला टीम साऊदीनं धक्के दिले. त्यानं रवींद्र जडेजा ५० धावांवर त्रिफळाचीत केले. शुबमन गिल व अजिंक्य रहाणे यांच्याप्रमाणेच चेंडू जडेजाच्या बॅटीला लागून यष्टींवर आदळला. जडेजा बाद झाल्यानंतर श्रेयसनं आक्रमक खेळ केला. श्रेयस १७१ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह १०५ धावांवर माघारी परतला. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. वृद्धीमान सहा ( १) व अक्षर पटेल ( ३) हेही टीम साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाले. आर अश्विन संघर्ष कराताना ३८ धावा करून संघाच्या धावसंख्येत भर घातली. अजाझ पटेलनं त्याची विकेट घेतली. पहिल्या दिवसाच्या ४ बाद २५८ धावांवरून आज टीम इंडियाचे सहा फलंदाज ८७ धावांत माघारी परतले. न्यूझीलंडनं चांगला कमबॅक करताना टीम इंडियाला ३४५ धावांवर रोखले.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम व विल यंग यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना भारताला सडेतोड उत्तर दिले आहे.
रोहित शर्मानं शेअर केलेला व्हिडीओ पाहा..
Web Title: Video : Dance move by Rohit sharma, shreyas Iyer & Shardul Thakur, Hitman share video to congratulate Shreyas
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.