Dinesh Karthik the Finisher Video, IPL 2022 RCB vs SRH Live: RCB ने घेतलेला फलंदाजीचा निर्णय संघाच्या कर्णधाराच्या फलंदाजांसह सार्थ ठरवला. कर्णधार फॅफ डू प्लेसीसची नाबाद ७३ धावांची खेळी आणि दिनेश कार्तिकचा फिनिशिंग टच याच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाला १९३ धावांचे आव्हान दिले. शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने केलेली फटकेबाजी तुफान हिट ठरली. त्याने शेवटच्या चार चेंडूत ३ षटकार आणि १ चौकार खेचत संघाची धावसंख्या १९२ धावांपर्यंत नेली. आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या फजलहक फारूखीने शेवटच्या षटकात तब्बल २५ धावा दिल्या.
RCB च्या डावाबाबत बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करण्यासाठी विराट कोहली आणि फॅफ डू प्लेसिस मैदानात उतरले. डावाच्या पहिल्याच चेंडूवर विराट झेलबाद झाला आणि शून्यावर माघारी परतला. त्यानंतर डू प्लेसिस आणि रजत पाटीदार जोडीने १०५ धावांची भागीदारी केली. रजत पाटीदार अर्धशतकाजवळ असताना त्याला बाद व्हावे लागले. त्याने ३८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार खेचत ४८ धावा केल्या. त्याच्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने २४ चेंडूत ३३ धावांची वेगवान खेळी केली. संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने संपूर्ण २० षटके खेळून ५० चेंडूत ७३ धावा केल्या. त्यात ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्यातच दिनेश कार्तिकने डावाला फिनिशिंग टच दिला. त्याने ८ चेंडूत ४ षटकार आणि एका चौकारासह नाबाद ३० धावा केल्या. पाहा Video-
सनरायझर्स हैदराबाद- अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन (किपर), शशांक सिंग, जगदीशा सुचिथ, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, उमरान मलिक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर-विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (किपर), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड