लॉकडाऊनमुळे सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे क्रिकेटपटू आपापल्या कुटुंबीयाना पुरेसा वेळ देत आहेत. अशात वेस्ट इंडिजचा स्टार ऑलराऊंडर ड्वेन ब्राव्होनं त्याच्या नव्या गाण्याची तयारी करत आहे. त्याचं हे गाणं चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर आहे. CSK ने या गाण्याचा टिजर पोस्ट केला आहे. ब्राव्होनं म्हटलं की,''माझ्या नव्या गाण्याची ही झलक आहे. माझ्या भावासाठीचं हे गाणं आहे.
धोनीनं आपल्यावर खुप विश्वास दाखवल्याचही ब्राव्हो म्हणाला. इंस्टाग्राम चॅटवर त्यानं हा खुलासा केला. तो म्हणाला,''महेंद्रसिंग धोनीनं माझ्यावर खुप विश्वास दाखवला. प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही मला मुक्तपणे खेळण्याची संधी दिली. डेथ ओव्हर्समध्ये मला काही वेळा चांगली कामगिरी करता आली नाही. तरीही संघानं माझ्यावरील विश्वास कायम ठेवला. ''
पाहा व्हिडीओ...
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धाही एका वर्षानं पुढे ढकलण्यात आली आहे आणि इंडियन प्रीमिअर लीगची पुढील सुचनेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेटपटू आपापल्या कुटुंबीयांना वेळ देत आहेत. पण, आयपीएल स्थगित झाल्यामुळे महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियातील पुनरागमनाच्या आशा मावळत चालल्या आहेत.
इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. मागील नऊ महिन्यांपासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. या कालावधीत त्यानं आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवला. पण, आयपीएलमधील त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आता आयपीएल होण्याची शक्यताही मावळत चालली आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
लॉकडाऊनमध्ये फुटबॉलपटू ड्रोनने पाठवतोय 35 लाख कंडोम; कोरोना लढ्यात असाही हातभार
चीनमध्येही कमळ खुलणार; जगातील सर्वात मोठे स्टेडिअम बांधणार
ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडला धक्का; 'Hotness' मध्ये 20 वर्षीय अभिनेत्रीनं टाकलं मागे
फुटबॉल विश्वाला धक्का; सामन्यासाठी सराव करताना 22 वर्षीय खेळाडूचा मृत्यु
10-11 वर्षांपूर्वीच दिलेला सल्ला, आता जगाला पटतंय महत्त्व; शोएब अख्तरचा दावा
भारतीय क्रिकेटपटूचे वडील करतायत रुग्णांची सेवा
Web Title: Video: Dwayne Bravo shares glimpse of new song on MS Dhoni svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.