कोरोना व्हायरसमुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीगवरही ( आयपीएल 2020) अनिश्चिततेचं सावट आहे. त्यात लॉकडाऊनमुळे सर्व खेळाडूंना घरी बसावं लागले आहे. आता त्यांना कुटुंबीयांना वेळ देता येत आहेत. पण, व्हिडीओ चॅटच्या माध्यमातून हे खेळाडू अन्य खेळाडूंशी संवाद साधत आहेत. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी असाच व्हिडीओ चॅट केला. या दोघांनी या संवादात बऱ्याच गप्पा मारल्या. पण, त्यातील रिषभ पंतवरील रोहितची कमेंट सर्वांचे लक्ष वेधणारी ठरली.
रिषभनं रोहितला सर्वात उंच्च व लांब षटकार खेचण्याचं आव्हान दिलं. त्यावर रोहित म्हणाला,''क्रिकेट खेळून एक वर्ष झालं नाही आणि माझ्याशी षटकार मारण्याची स्पर्धा करतोय?''
पाहा व्हिडीओ...
रोहितने बुमराहला घरी बसून काय करतोस असे विचारल्यानंतर बुमराहने लगेचच भांडी धुणे, आईला स्वयंपाकास मदत करणे तसेच घरकाम करणे असे प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट केले. त्यावर रोहितने हसत त्याला दाद दिली. रोहितनेही आपण लहानपणी घरातील अशी सर्व कामे करीत होतो, असा अनुभव सांगितला. आता या गोष्टींची सवय नसल्याने थोडे वेगळे वाटते, असेही तो म्हणाला.
चहलवर केले विनोदरोहित शर्मा आणि बुमराहने भारताचा फिरकीपटू यजुवेंद्र चहलवर अनेक विनोद केले. त्याची फिरकीही घेतली. शर्मा म्हणाला की बुमराहला चहलपूर्वी फलंदाजीस यायला हवे, कारण चहलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजवर एकही षटकार मारला नाही. याऊलट बुमराहने दिग्गज गोलंदाजांना षटकार खेचले आहे. त्यामुळे चहलने एकतरी षटकार मारून दाखवावा, असे आव्हान दोघांनी यावेळी दिले.