वन डे वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू आहेत. पण, धोनी कधी निवृत्ती जाहीर करेल, याबाबत कुणीही ठाम मत मांडत नाही. त्यात भारतीय संघातील खेळाडूंना माहीची आठवण येत आहे. भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे आणि पाच ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत संघानं 2-0 अशी मजबूत आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियानं ऑकलंड ते हॅमिल्टन असा बस प्रवास केला. या प्रवासादरम्यान फिरकीपटू युजवेंद्र चहलनं खेळाडूंशी गप्पा मारल्या. त्यादरम्यान धोनीच्या आठवणीनं चहल भावूक झालेला पाहायला मिळाला.
धोनीच्या निवृत्तीबाबत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी नुकतंच मोठं विधान केलं होतं. आगामी इंडियन प्रीमिअर लीगमधील कामगिरीवर धोनीची निवृत्ती अवलंबून आहे. आयपीएलमधील कामगिरीच धोनी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळेल की नाही, हे ठरवणारी असेल, असं शास्त्री म्हणाले होते. त्यामुळे आता सर्वांना आयपीएलचे वेध लागले आहेत. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) सेंट्रल काँट्रॅक्टमधून वगळून धोनीला थेट निवृत्ती घेण्याचे संकेत दिल्याच्याही चर्चा रंगत आहेत.
त्यामुळे निवृत्तीबाबत धोनीच काय ते स्पष्ट सांगू शकतो. वन डे वर्ल्ड कपनंतर धोनी टीम इंडियाकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे संघातील अन्य खेळाडूंना त्याची आठवण येत आहे. युजवेंद्र चहलनं त्या सर्वांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ऑकलंड ते हॅमिल्टन अशा बस प्रवासात चहलनं 'कॉर्नर सीट' बाबत सांगितले. ती सीट धोनीची आहे आणि आजही त्यावर कुणी बसत नाही, असं सांगताना चहल भावूक झाला होता.
पाहा व्हिडीओ
‘खेलो इंडिया’ विजेत्यांना रोख पुरस्कार, क्रीडामंत्र्यांची घोषणा
मुंबईत रंगणार आयपीएलचा अंतिम सामना; २४ मेला ठरणार विजेता
राफेल नदाल, झ्वेरेव, थीएम व हालेप यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक