बिग बॅश लीमगध्ये गुरुवारी ब्रिस्बेन हिट संघानं होबार्ट हरिकेन्स संघावर 5 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. गॅबा येथे झालेल्या या सामन्यात ब्रिस्बेन हिट संघानं जिमी पिएरसन आणि अष्टपैलू बेन कटिंग यांच्या 60 धावांच्या भागीदारीच्या जोरावर हा विजय मिळवला. 127 धावांचा पाठलाग करताना ब्रिस्बेन संघाचा निम्मा संघ 71 धावांत तंबूत परतला होता. त्यानंतर पिएरसन ( 23) आणि कटिंग ( 43) यांनी दमदार खेळ करताना संघाला विजय मिळवून दिला.
Video : 2020 मधील पहिला वादग्रस्त निर्णय? तुम्हीच ठरवा फलंदाज Out की Not Out!
प्रथम फलंदाजीला आलेल्या हरिकेन्स संघाचे पाच फलंदाज 59 धावांत माघारी पाठवून हिट संघानं सामन्यावर पकड घेतली होती. कर्णधार वेड एकाबाजूनं खिंड लढवत होता. त्यानं 46 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकार खेचून 61 धावांची खेळी केली. त्याला थॉमस रॉजर्स ( 17) आणि नॅथन एलिस ( 13*) यांनी छोटेखानी खेळी करून साथ दिली. त्या जोरावर त्यांनी 9 बाद 126 धावा केल्या.
Video: पाकिस्तानी गोलंदाजाला इंग्लिश जमेना, घ्यावी लागली नेपाळच्या खेळाडूची मदत
सामना संपल्यानंतर टीव्ही अँकर एरिन हॉलंड हीनं कटिंगला प्रश्न विचारली. या सामन्यात कटिंगनं 1 विकेट आणि 29 चेंडूंत ( 3 चौकार व 3 षटकार) 43 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. त्यावेळी एरिननं ऑस्ट्रेलियन फलंदाज कटिंगला एक धमकी दिली. एरिन आणि कटिंग यांचा नुकताच साखरपुडा झाला होता. ब्रिस्बेन हिटचा पुढील सामना पर्थवर होणार आहे आणि एरिननं कटिंगला चांगलेच खडसावले आहे.
चर्चा तर होणारच; क्रिकेटच्या मैदानावर अवतरली 'Miss World'!
चाहत्यानं प्रश्न विचारला अन् तिनं युवराज सिंगवर फोडलं खापर, नेमकं झालं तरी काय?