Faf Du Plessis Six, IPL 2022 RCB vs SRH Video: सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात बंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादच्या संघाने दोन महत्त्वाचे बदल केले. सीन अबॉट आणि कृष्णप्पा गौतम या दोघांना संघाबाहेर बसवलं. त्याच्याजागी जगदीश सुचिथ आणि फारूखी या दोघांना संधी दिली. संघात संधी मिळालेल्या जगदीश सुचिथने पहिल्या चेंडूवर विराटला माघारी पाठवलं. पण कर्णधार फाफ डू प्लेसिसने मात्र तुफान फटकेबाजी केली. त्याने वेगाचा बादशाह समजल्या जाणाऱ्या उमरान मलिकला अत्यंत वेगाने जागेवर उभं राहून षटकार लगावला. पाहा व्हिडीओ-
विराट जरी शून्यावर बाद झाला असला तरीही फाफ डु प्लेसिस आणि रजत पाटीदार या जोडीने दमदार कामगिरी केली. या दोघांनी १०५ धावांची भागीदारी केली. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे, पाटीदारचं अर्धशतक हुकलं पण डू प्लेसिसने मात्र दमदार कामगिरी केली. त्याने आपल्या IPL कारकिर्दीतील २५वे अर्धशतक ठोकले. चौकार लगावत त्याने हा टप्पा गाठला. त्यासोबत त्याच्या IPL कारकिर्दीत ३०० चौकार मारण्याचा टप्पाही त्याने ओलांडला.
सनरायझर्स हैदराबाद- अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन (किपर), शशांक सिंग, जगदीशा सुचिथ, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, उमरान मलिक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर- विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (किपर), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड