भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दणदणीत विजयाची नोंद करताना मालिका २-१ अशी जिंकली. शुभमन गिलचे विक्रमी शतक आजच्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. शुभमनने आजच्या या नाबाद १२६ धावांच्या खेळीने मोठमोठे विक्रम मोडले. त्याच्या फटकेबाजीनंतर भारतीय जलदगती गोलंदाजांनी कमाल केली.
तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताने १६८ धावांनी मोठा विजय मिळवत मालिकाही जिंकली आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतानं २३५ धावाचं तगडं लक्ष्य न्यूझीलंडसमोर ठेवलं. यावेळी भारताकडून युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलनं शानदार शतक झळकावलं आहे. त्यानंतर कर्णधार हार्दिकनं ४ विकेट्स घेत इतर गोलंदाजाच्या मदतीनं न्यूझीलंडला ६६ धावांत सर्वबाद करत सामना धावांनी जिंकला.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पृथ्वी शॉला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र मालिका जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने असे काही केले ज्याचे खूप कौतुक होत आहे. पोस्टमॅच प्रेझेंटेशनमध्ये हार्दिक पांड्याकडे टी-२० मालिकेची ट्रॉफी सुपूर्द केल्यानंतर त्याने तो चषक पृथ्वी शॉकडे दिला. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्याचा व्हिडिओ शेअर केला असून चाहत्यांना खूप आवडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पृथ्वी शॉला प्रदीर्घ कालावधीनंतर टी-२० संघात स्थान मिळाले होते, मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तो स्थान मिळवू शकला नाही.
दरम्यान, पृथ्वी शॉने जुलै २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. न्यूझीलंड संघाविरुद्धच्या सध्याच्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये गिल आणि इशान किशन यांची कामगिरी काही खास नव्हती. अशा परिस्थितीत पृथ्वी शॉला तिसऱ्या टी-२०मध्ये संधी मिळेल, अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. निर्णायक टी-२०मध्ये गिल आणि इशान या सलामीच्या जोडीवर संघ व्यवस्थापनाने विश्वास व्यक्त केला. गिलने शतक झळकावले, तर ईशान किशन पुन्हा अपयशी ठरला.
टीम इंडियाने केला हा करिष्मा
भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा टी२० सामना १६८ धावांनी जिंकला. भारताचा टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी २०१८ मध्ये भारताने आयर्लंडचा १४३ धावांनी पराभव केला होता. टी२० क्रिकेटमधील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम श्रीलंका संघाच्या नावावर आहे. २००७ मध्ये श्रीलंकेने केनियन संघावर १७२ धावांनी विजय मिळवला होता.
आंतरराष्ट्रीय टी-20 मधील सर्वात मोठा विजय
२००७ मध्ये श्रीलंकेने केनियाचा १७२ धावांनी पराभव केला.
भारताने २०२३ मध्ये न्यूझीलंडचा १६८ धावांनी पराभव केला.
पाकिस्तानने २०२२ मध्ये हाँगकाँगचा १५५ धावांनी पराभव केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Video: Hardik Pandya hands trophy to Prithvi Shaw after India win T20I series against New Zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.