Join us

VIDEO: खुल्लम खुल्ला प्यार! हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड जास्मिन वालिया टीम बसमध्ये शिरली अन्...

Hardik Pandya Jasmin Walia Mumbai Indians Viral Video, IPL 2025 MI vs KKR: मुंबईचा सामना संपल्यानंतर रात्रीच्या वेळी घडला हा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:37 IST

Open in App

Hardik Pandya Jasmin Walia Mumbai Indians Viral Video, IPL 2025 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या संघाला अखेर वानखेडेच्या मैदानावर सूर गवसला. पहिल्या दोन सामन्यात मुंबईच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. पण कोलकाताच्या सामन्यात त्यांनी अतिशय सहज विजय मिळवला. कोलकाताच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना अंगक्रिश रघुवंशीच्या सर्वाधिक २६ धावांच्या बळावर ११६ धावा केल्या. आपला पहिला IPL सामना खेळणारा अश्वनी कुमार याने २४ धावांत ४ बळी घेत साऱ्यांना अवाक् केले. त्यानंतर मुंबईच्या संघाकडून रायन रिकल्टनने नाबाद ६२ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवनेही ९ चेंडूत नाबाद २७ धावा केल्या. या साऱ्यांची चर्चा रंगलीच. पण त्यासोबत आणखी एका व्यक्तीची सध्या चर्चा रंगली आहे, ती म्हणजे हार्दिक पांड्याची तथाकथित गर्लफ्रेंड जास्मिन वालिया. ब्रिटीश गायिका आणि टीव्ही सेलिब्रिटी असलेल्या जास्मिन वालियाबाबत सध्या एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हार्दिकच्या गर्लफ्रेंडचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामात तीन सामने खेळले. त्यातील घरच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेला हा पहिलाच सामना होता. मुंबईने याआधी जिथे सामने खेळले तिथे हार्दिकची गर्लफ्रेंड जास्मिन वालिया स्टेडियममध्ये हजर होती. काल मुंबईच्या स्टेडियममध्येही ती आली होती. त्यानंतर तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. असे सांगण्यात येत आहे की, जास्मिन वालिया मुंबई इंडियन्सच्या टीम बसमध्येच चढली आणि ती त्यांच्या टीम बसमधूनच प्रवास करताना दिसत आहे. टीम बसमधून केवळ खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंचे पार्टनर्स यांनाच प्रवासाची परवानगी असते. त्यामुळे हार्दिक आणि जास्मिन यांच्यात नक्कीच काहीतरी शिजतंय, या चर्चेला आता खतपाणी मिळाले आहे.

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५हार्दिक पांड्यामुंबई इंडियन्सव्हायरल व्हिडिओ