Join us  

Video : हार्दिक पांड्या झाला 'सुपरमॅन', मार्टिन गप्टिलचा हैराण करणारा कॅच

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या तडाख्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला पहिल्या टी-20 सामन्यात 53 धावांनी लोळवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2017 12:44 PM

Open in App

नवी दिल्ली - रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या तडाख्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला पहिल्या टी-20 सामन्यात 53 धावांनी लोळवले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात पहिल्यांदाच भारताने किवी संघाला नमविण्याची कामगिरी केली.  फिरोजशाह कोटला स्टेडियमवर प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताने तुफान हल्ला करताना न्यूझीलंडपुढे विजयासाठी निर्धारित 20 षटकांत 203 धावांचे तगडे आव्हान ठेवले होते. 203 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजांनी नेहराच्या पहिल्या षटकात 6 धावा केल्या. पण कर्णधार कोहलीने दुसरं षटक फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला दिलं. चहलच्या  ओव्हरमधील तिस-या षटकात अशी घटना झाली ज्यामुळे मैदानातील आणि टीव्हीवर सामना पाहात असलेले प्रेक्षक हैराण झाले. चहलने टाकलेला बॉल मार्टिन गप्टिलने मिड ऑफच्या वरून भिरकावला. षटकार मारण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्यानं मारलेला चेंडू सीमापार करणार असं वाटत असतानाच हार्दिक पांड्या धावत आला. चेंडूजवळ आपण पोहोचणार नाही हे समजताच पांड्याने सुपरमॅनप्रमाणे अक्षरश: हवेत सूर मारुन गप्टिलचा अप्रतिम झेल टिपला. पांड्याच्या या कॅचमुळे टीम इंडियाची सुरूवातही सुपर झाली आणि अखेरीस भारताने हा सामना जिंकला. 

पाहा व्हिडीओ -

  

टॅग्स :हार्दिक पांड्याक्रिकेटन्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघ