India Tour of Sri Lanka : श्रीलंकेला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करण्यासाठी टीम इंडिया शिखर धवनच्या नेतृत्वाखाली कसून सराव करत आहे. दुसऱ्या आंतर-संघ सराव सामन्यात भारतीय फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. १३ जुलैपासून वन डे मालिकेला सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी आंतर संघ सामन्यात हार्दिक पांड्या, पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांनी टोलेजंग फटकेबाजी केली. शिखर धवन एकादश आणि भुवनेश्वर एकादश अशा दोन संघांमध्ये हा सामना खेळवण्यात आला.
पहिल्या सराव सामन्यात भुवनेश्वर एकादश संघानं धवनच्या संघावर मात केली होती. त्यात लोकेश राहुल, सूर्यकुमार यांनी अर्धशतकी खेळी केली होती. आज हार्दिक, सूर्यकुमार, पृथ्वी, ऋतुराज गायकवाड यांनी अंतिम ११साठी आपापली दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं त्यांच्या यू ट्यूब चॅनेलवर सराव सामन्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
पाहा व्हिडीओ..
स्पर्धेचे वेळापत्रक
वन डे मालिका - 13, 16 व 18 जुलै, कोलंबो
ट्वेंटी-20 मालिका - 21, 23 व 25 जुलै, कोलंबो