Join us  

Video : टीम इंडियाच्या कर्णधाराचं 'Magic'; बघा तुम्हाला जमतंय का?

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 2:00 PM

Open in App

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात देशात कोणत्याही स्पर्धा होणार नाही. त्यामुळे खेळाडूंना आपापल्या कुटुबीयांना वेळ द्यायला मिळत आहे. शिवाय आपली दुसरी आवडही जपायला मिळत आहे. कोणी जेवण बनवत आहे, तर कोणी हस्तकला, चित्रकला करताना दिसत आहेत. पण, भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर जादूगार झालेली पाहायला मिळत आहे. हरमनप्रीतनं इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि तिचं Magic पाहून सर्वच थक्क झाले आहेत. यापूर्वी भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरनं जादूगारी दाखवली होती.

पाहा व्हिडीओ...   

रितू फोगाट योगा, सिनेमा, पुस्तक वाचनात व्यस्त

 कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनच्या काळात कुटुंबापासून दूर असलेली मिक्स मार्शल आर्ट फायटर रितू फोगाट मानसिक कणखरता वाढविण्यावर भर देत आहे. या ब्रेकचा वापर ती शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी करताना दिसते.२०१६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीचे सुवर्ण विजेती रितू येथे दैनंदिन सरावानंतर पुस्तके वाचण्यात, सिनेमा पाहण्यात आणि योगा करण्यात वेळ घालवत आहे. महिला मल्ल ते मिक्स मार्शल आर्ट फायटर असा प्रवास करणारी रितू हिने स्वत:चा दुसरा विजय येथे फेब्रुवारीत वन चॅम्पियनशिपमध्ये नोंदवला होता. सध्या ती सिंगापूरमध्ये आहे. स्वत:चे कौशल्य उंचावण्यासाठी या ब्रेकचा वापर करण्याचे ठरवले असून त्यासाठी नित्यनेमाने दररोज साडेतीन तास शारीरिक आणि मानसिक व्यायामाचा सराव चालतो, असे रितूने सांगितले.ती पुढे म्हणाली,‘ लॉकडाऊनमध्ये मी माझे संपूर्ण वेळापत्रक तयार केले आहे. त्यात ट्रेडमिलवर धावणे, वजन उचलणे, बॅग पंचिंग आणि दोराच्या साहाय्याने चढण्याचा सराव आदींचा समावेश आहे. यामुळे शारीरिक दम वाढतो शिवाय मानसिकरीत्या आपण कणखर होत जातो. सध्या मी योगासनाचा मोठ्या प्रमाणावर सराव करीत आहे. सिंगापूरमध्ये वास्तव्यास असल्यापासून माझा दैनंदिन सराव सुरू झाला. यामुळे पुढील स्पर्धांमध्ये विजय मिळविणे सोपे होईल, अशी आशा आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Arnab Goswami यांच्या समर्थनात कुस्तीपटू बबिता फोगाट आखाड्यात; म्हणाली...

पाकिस्तानी फलंदाज देशासाठी खेळतात, भारतीय स्वतःसाठी; पाकचा माजी कर्णधार बरळला

मोठा निर्णय : 'युनिव्हर्स बॉस' Chris Gayleच्या मदतीला किंग्स इलेव्हन पंजाब धावला

'Sex Video'मुळे महिला खेळाडूचं आयुष्य झालं होतं उद्ध्वस्त; तीन दिवस घरातच होता मृतदेह

CSKनं MS Dhoniची निवड केल्यानं मोठा धक्का बसला; दिनेश कार्तिकनं व्यक्त केली खंत

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याभारतीय क्रिकेट संघ