Join us  

Fareed Ahmad and Asif Ali Video: भरमैदानातच तुफान राडा! पाकिस्तानच्या आसिफने थेट फरीदच्या अंगावरच उगारली बॅट अन्...; नक्की काय घडलं

बाद झाल्यानंतर पाकिस्तानी फलंदाजाची 'ही' कृती फॅन्सना रूचली नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 12:02 AM

Open in App

Fareed Ahmad and Asif Ali Video: पाकिस्तानच्या नसीम शाहने आज पाकिस्तानला पराभवाच्या दाढेतून विजय खेचून आणून दिला. अतिशय अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानने अफगाणिस्तानवर शेवटच्या षटकात विजय मिळवला आणि स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. १३० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना अखेर षटकात पाकिस्तानला ११ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी नसीमने पहिल्या २ चेंडूत २ षटकार मारून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. पाकिस्तानचा विजय झाला, पण या सामन्याला पाकिस्तानच्या एका फलंदाजामुळे गालबोट लागले.

नक्की काय घडला प्रकार-

१३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १० षटकात ३ बाद ५२ धावांवर खेळत होता. शादाब खान आणि इफ्तिखार यांनी फटकेबाजी केली. पण इफ्तिखार ३३ धावांवर तर शाबाद खान ३६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या आसिफ अलीने २ उत्तुंग असे षटकार लगावले. पण तिसरा षटकार मारताना बाऊन्सर चेंडूवर तो झेलबाद झाला. तंबूत परतत असताना त्याच्यात आणि गोलंदाज फरीद अहमद यांच्यात थोडीशी बाचाबाची झाली. पण त्या बाचाबाचीचे रूपांतर अचानक हाणामारीत होते की काय, असे दिसले. आसिफ अलीने थेट फरीदच्या अंगावर बॅट उगारली. फरीदनेही त्याला धक्का देत दोन करण्यास तयार असल्याचा मूक संदेश दिला. पण तितक्यात अफगाणिस्तानचे खेळाडू आणि पंच यांनी हा वाद वेळीच थांबवला व आसिफ अलीला तंबूत जाण्याची विनंती केली.

पाहा हा 'जेंटलमन्स गेम' म्हणणाऱ्या क्रिकेटला लाज आणणारा प्रकार (Video)- 

--

--

--

दरम्यान, सामन्यात पाकिस्तानच्या संघाने पहिल्यापासूनच आपले वर्चस्व कायम राखले होते. सुरूवातील अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी चाहत्यांची साफ निराशा केली. इब्राहिम झाद्रान फटकेबाजी करत होता. त्याने २ चौकार आणि १ षटकार खेचत सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. तर हजरतुल्ला झझाई (२१) व राशिद खान (१८) यांनी फटकेबाजी करत संघाला १२९ चा पल्ला गाठून दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. शादाब खान आणि इफ्तिखारने सामना पालटला. त्यानंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी पुन्हा सामना आपल्या दिशेने वळवला. पण अखेर नसीम शाहने दोन षटकार मारत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

टॅग्स :एशिया कप 2022पाकिस्तानअफगाणिस्तानसोशल मीडिया
Open in App