Fareed Ahmad Asif Ali Video: मैदानात 'राडा' करणाऱ्या आसिफ-फरीदला ICC चा दणका; केली 'ही' कारवाई

पाकिस्तानी फलंदाजाची 'ही' कृती फॅन्सना रूचली नव्हती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 11:18 PM2022-09-08T23:18:01+5:302022-09-08T23:18:29+5:30

whatsapp join usJoin us
Video heated arguments Fareed Ahmad Asif Ali verbal spat turned violent icc imposes fine to both PAK vs AFG in Asia Cup 2022 | Fareed Ahmad Asif Ali Video: मैदानात 'राडा' करणाऱ्या आसिफ-फरीदला ICC चा दणका; केली 'ही' कारवाई

Fareed Ahmad Asif Ali Video: मैदानात 'राडा' करणाऱ्या आसिफ-फरीदला ICC चा दणका; केली 'ही' कारवाई

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Fareed Ahmad Asif Ali Video: पाकिस्तानच्या नसीम शाहने बुधवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाच्या दाढेतून विजय खेचून आणून दिला. अतिशय अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानने अफगाणिस्तानवर शेवटच्या षटकात विजय मिळवला आणि स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. १३० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना अखेर षटकात पाकिस्तानला ११ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी नसीमने पहिल्या २ चेंडूत २ षटकार मारून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. पाकिस्तानचा विजय झाला. या सामन्यात पाकिस्तानचा आसिफ अली आणि अफगाणिस्तानचा फरीद अहमद यांनी भरमैदानात राडा केला होता. त्याची गंभीर दखल घेत ICC त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे.

नक्की काय घडला होता प्रकार-

१३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १० षटकात ३ बाद ५२ धावांवर खेळत होता. शादाब खान आणि इफ्तिखार यांनी फटकेबाजी केली. पण इफ्तिखार ३३ धावांवर तर शाबाद खान ३६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या आसिफ अलीने २ उत्तुंग असे षटकार लगावले. पण तिसरा षटकार मारताना बाऊन्सर चेंडूवर तो झेलबाद झाला. तंबूत परतत असताना त्याच्यात आणि गोलंदाज फरीद अहमद यांच्यात थोडीशी बाचाबाची झाली. पण त्या बाचाबाचीचे रूपांतर अचानक हाणामारीत होते की काय, असे दिसले. आसिफ अलीने थेट फरीदच्या अंगावर बॅट उगारली. फरीदनेही त्याला धक्का देत दोन करण्यास तयार असल्याचा मूक संदेश दिला. पण तितक्यात अफगाणिस्तानचे खेळाडू आणि पंच यांनी हा वाद वेळीच थांबवला व आसिफ अलीला तंबूत जाण्याची विनंती केली.

--

ICC ने काय केली कारवाई?

या वादानंतर क्रिकेटरसिकांनी याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला होता. या राड्याची ICC ने ही दखल घेतली. त्यानंतर आज ICC ट्विट करत, या दोघांनाही आपल्या सामन्याच्या मानधनातील २५ टक्के रक्कम दंड म्हणून ठोठवल्याचे जाहीर केले. आसिफने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठीच्या ICC आचारसंहितेच्या अनुच्छेद २.६चे उल्लंघन केले. २.६ कलमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान अश्लील, आक्षेपार्ह किंवा अपमानास्पद असा हावभाव करणे योग्य नाही. तर फरीदने अनुच्छेद २.१.१२ चे उल्लंघन केल्याचे आढळून आले. आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान खेळाडू, सहाय्यक कर्मचारी, पंच, सामनाधिकारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी (प्रेक्षकांसह) अयोग्य पद्धतीने शारीरिक संपर्क किंवा हाणामारी करू नये, असे हे कलम आहे. या दोघांनी नियमांचे पालन न केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, सामन्यात पाकिस्तानच्या संघाने पहिल्यापासूनच आपले वर्चस्व कायम राखले होते. सुरूवातील अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी चाहत्यांची साफ निराशा केली. इब्राहिम झाद्रान फटकेबाजी करत होता. त्याने २ चौकार आणि १ षटकार खेचत सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. तर हजरतुल्ला झझाई (२१) व राशिद खान (१८) यांनी फटकेबाजी करत संघाला १२९ चा पल्ला गाठून दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. शादाब खान आणि इफ्तिखारने सामना पालटला. त्यानंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी पुन्हा सामना आपल्या दिशेने वळवला. पण अखेर नसीम शाहने दोन षटकार मारत पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता.

Web Title: Video heated arguments Fareed Ahmad Asif Ali verbal spat turned violent icc imposes fine to both PAK vs AFG in Asia Cup 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.