आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) बुधवारी 2019च्या पुरस्कारांची घोषणा केली. आयसीसीनं जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माला वन डे तील सर्वोत्तम खेळाडू ठरला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीकडे आयसीसीच्या वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. याशिवाय विराटला आणखी एक पुरस्कार मिळाला आणि त्याचे त्यालाच आश्चर्य वाटले. या पुरस्काराबाबत तो काय म्हणाला हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व असलेल्या कसोटी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे
ICC Awards: विराट कोहलीला आयसीसीकडून मानाचे पान! हा पुरस्कार देत केला गौरव
ICC Awards: विराट कोहलीची हॅटट्रिक हुकली, इंग्लंडच्या खेळाडूनं बाजी मारली
आयसीसीनं 2019मधील सर्वोत्तम खेळाडूला दिली जाणारी सर गॅरी सोबर्स ट्रॉफी ही इंग्लंडच्या बेन स्टोक्सला जाहीर केली. कसोटीतील सर्वोत्तम खेळाडूचा मान ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनं पटकावला. याशिवाय वर्षातील ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी दीपक चहरच्या नावावर नोंदवली गेली. यात विराटला 'स्पिरीट ऑफ क्रिकेट' म्हणजेच खिलाडूवृत्तीसाठीचा पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार आपल्याला का मिळाला याचे विराटलाच आश्चर्य वाटले.
बेन स्टोक्सला सर्वोच्च मान, पाहा ICC Awardsची संपूर्ण यादी एका क्लिकवर
गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत विराटने खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले होते. या स्पर्धेत गटसाखळीत भारत आणि ऑस्ट्रेलिया लढतीवेळी स्टीव्ह स्मिथ फलंदाजीस आल्यावर प्रेक्षकांनी त्याची हुटिंग करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी विराटने प्रेक्षकांना स्मिथची हुटिंग करू नका, असे आवाहन केले होते. या खिलाडूवृत्तीसाठी आयसीसीनं त्याला हा पुरस्कार जाहीर केला.
तो म्हणाला,''हा पुरस्कार का मिळाला, याचे मलाच आश्चर्य वाटत आहे. इतकी वर्ष सतत मी चुकीच्या कारणामुळेच चर्चेत राहीलो होतो. पण, स्मिथसोबत जे घडत होतं ते चुकीचं होत. आम्ही जरी प्रतिस्पर्धी असलो, तरी खेळाडू म्हणून एकमेकांचा आदर करतो. तुम्ही मैदानावर स्लेजिंग करा. पण, अशा प्रकारे एखाद्या खेळाडूला डिवचणे योग्य नव्हे. त्याचे मी कधीच समर्थन करणार नाही.''
पाहा व्हिडीओ...