भारत-इंग्लंड ( India vs England Test Series) यांच्यातल्या कसोटी मालिकेचा निकाल ३-१ असा टीम इंडियाच्या बाजूनं लागला. या विजयासह भारतीय संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC World Test Championship) अंतिम सामन्यात प्रवेश केला. आता टीम इंडियानं ट्वेंटी-२० मालिकेकडे लक्ष केंद्रित केले आहे. १२ मार्चपासून ही मालिका सुरू होत आहे. पण, तत्पूर्वी क्रिकेटपासून थोडासा ब्रेक घेत टीम इंडियाच्या खेळाडूंनी पुन्हा बालपण जगले. रिषभ पंत ( Rishabh Pant), रोहित शर्मा ( Rohit Sharma), शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांचा धम्माल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. MS Dhoni ला अखेरची आयपीएल चेन्नईत खेळता येऊ नये म्हणून रचला डाव; वेळापत्रकावरून रणकंदन
शिखर धवन कसोटी मालिकेत संघाचा सदस्य नव्हता, पंरतु ट्वेंटी-20 व वन डे मालिकेसाठी तो टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल झाला आहे. ''कितीही मोठे झालो तर बालपम जाता कामा नये. आयुष्यात काम करत राहणं महत्त्वाचं आहेच, पण रिलॅक्स राहण्यासाठी मस्तीही गरजेची आहे,''असे धवननं शेअर केलेल्या इस्टा व्हिडीओवर लिहिले आहे. IPL 2021 पूर्वीच RCBच्या फलंदाजाची वादळी फटकेबाजी, ६ सामन्यांत ६७३* धावा अन् कुमार संगकारा, विराट कोहलीच्या रेकॉर्डशी बरोबरी
हनिमुनवरून परतलेल्या युझवेंद्र चहलनंही या व्हिडीओवर कमेंट केली. तो म्हणाला, ''रुममधून मी या मुलांची मस्ती पाहत होतो.''त्यावर त्याची पत्नी धनश्रीनंही कमेंट केली,''युझीलाही तुमच्यासोबत खेळायला यायचं होतं.''
ट्वेंटी-20 व वन डे मालिकेचं वेळापत्रक
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका अहमदाबाद येथे होणार आहे. १२, १४, १६, १८ आणि २० मार्चला हे सामने होतील. त्यानंतर तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी संघ पुण्यासाठी रवाना होईल. २३ , २६ आणि २८ मार्चला वन डे सामने होतील.
ट्वेंटी-20 मालिकेसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
Web Title: Video : Indian Cricketers Take a Break from On-field Action, Have a Blast in ‘Kids Zone’
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.