कोरोना व्हायरसमुळे देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाला आहे. त्यात इंडियन प्रीमिअर लीगही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे अनेक क्रिकेटपटूंना घरीच रहावं लागलं आहे. या निमित्तानं क्रिकेटपटूंना आपल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता येत आहे. अशा परिस्थिती घरी असलेल्या टीम इंडियाच्या हिटमॅन रोहित शर्माला काय काय करावं लागतं आहे, ते तुम्हीच पाहा. रोहितनं त्याची ही व्यथा इंग्लंडचा माजी खेळाडू केव्हीन पीटरसनला सांगितली आहे.
काही दिवसांपूर्वी रोहितचा मुली समायरासोबत खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर रोहित व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून अन्य क्रिकेटपटूंशी चॅट करत आहे. रोहित आणि केपी यांच्यात असाच संवाद झाला. त्यावेळी केपीनं त्याला घरात राहण्याचा अनुभव विचारला. तेव्हा रोहितनं अनेक किस्से सांगितले. त्यानं घराची साफ सफाई करण्यासाठी 2 तासांहून अधिक वेळ लागल्याचं सांगितलं.
शर्मानं सांगितलं की,''मी अखेरचं घर कधी साफ केलं, हे मलाही आठवत नाही. मी आता संपूर्ण घर साफ केलं. मुलीसोबत क्रिकेट खेळताना तुम्ही घर पाहिलंच असेल. घर साफ करणं ही सोपी गोष्ट नाही, मला दोन तासांहून अधिक वेळ लागला. मी दुपारी तुझा मॅसेज पाहिला आणि 2.30 वाजत मी त्याचे उत्तर दिले. यावेळेत मी घर साफ करत होतो आणि मला जवळपास अडीच तास लागले.''
या अडीच तासात काय केलंस, हे केपीनं विचारलं तेव्हा रोहित म्हणाला,''कपडे धुतले, फ्लोरिंग साफ केली, खिडकीच्या काचा पुसल्या... तू व्हिडीयोत त्या पाहू शकतोस. माझ्या मुलीला खेळता यावं म्हणून ही साफसफाई.''
पाहा व्हिडीओ...
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Salute : आफ्रिदीनंतर बांगलादेशच्या कर्णधारानं घेतली 300 गरीब कुटुंबांची जबाबदारी
Video : कोरोना व्हायरसमुळे भयभीत आहात? DJ Bravoचं नवं प्रेरणादायी गाणं ऐका
Video : क्वारंटाईनमध्ये विराट-अनुष्का काय करतायत ते पाहा!
Corona Virus : 21 वर्षीय टेनिसपटूची समाजसेवा; गरजूंना वाटतेय जीवनावश्यक वस्तू
India Vs Corona: 10 श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी 'या' सहा जणांनी अजूनही दाखवलेली नाही मनाची श्रीमंती
MS Dhoni चा निवृत्तीचा निर्णय झाला पक्का, लवकरच घोषणा