संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या संकटाशी झगडत आहे. जगभरात आतापर्यंत २ लाख ४५, ७४९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील मृतांचा आकडा १० हजाराच्या वर गेला आहे, पण बरे झालेल्यांची संख्या ८८, ४४१ इतकी आहे. सर्वांना घरीच राहण्याचं आवाहन केलं जात आहे. त्यामुळे अनेक खेळाडू एकांतवासात गेले आहेत. त्यामुळे त्यांचा दैनंदिन दिनक्रमही बदलला आहे. त्यांना घराबाहेर पडताच येत नाही. मग, अशात विविध शक्कल लढवून ते स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन यानं लढवलेली शक्कल ही तुम्हाला लोटपोट करेल.
कोरोना व्हायरसमुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, बुंदेसलिगा, सीरि ए इटालियन लीग, चॅम्पियन्स लीग, युरोपा लीग आदी फुटबॉल स्पर्धांसह एटीपी आणि डब्लूटीपी या टेनिस स्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल 2020) १३ व्या मोसमावरही अनिश्चिततेचं सावट आहे. आयसीसीनंही महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे सर्व क्रिकेटपटू आपापल्या घरी परतले आहेत.
पण, कोरोना व्हायरसपासून बचावासाठी सर्वांना घरीच राहणे पसंत केले आहे. त्यामुळे त्यांचा व्यायाम करण्याची गैरसोय होत आहे. अँडरसननं मात्र यावर शक्कल लढवली आहे. तोही एकांतवासात आहे आणि त्यानं त्याच्या मुलीला deadlifting करून ट्रेनिंग केली. अँडरसननं तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Corona Virus : ...अन् इंग्लंडचा खेळाडू बनला अन्नदाता; शाळकरी मुलांना पुरवतोय जेवण!
पंतप्रधान मोदींची 'जनता कर्फ्यू'ची साद; विराट, शास्त्री, भज्जी, साक्षीने 'असा' दिला प्रतिसाद
Corona Virusशी मुकाबला करण्यासाठी शेन वॉर्नचा मोठा निर्णय; तुम्हीही कराल कौतुक
Corona Virus : विरुष्काचं लोकांना महत्त्वपूर्ण आवाहन; पाहा व्हिडीओ
बोल्ड अँड ब्युटिफुल टेनिसस्टार असं काही बोलली की जगभरातील चाहते 'सुटलेच'!