कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. सर्व देशांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यात पाकिस्तानवरील कर्ज अजून वाढलं आहे आणि हे कर्ज फेडण्यासाठी पाकिस्तानचा माजी कर्णधारावर भीक मागण्याची वेळ आली आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 42 लाख 07,139 इतकी झाली असून त्यापैकी 15लाख 04,471 जणं बरी झाली आहेत, परंतु 2 लाख 84, 334 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पाकिस्तानातील कोरोना रुग्णांचा आकडा 30,941 इतका झाला असून 667 जणांचा मृत्यू झाला आहे.
Video : हरभजन सिंगला मारायला गेलो होतो, पण तो वाचला; Shoaib Akhtarचा धक्कादायक खुलासा
'मला मूर्ख बनवू नकोस'; MS Dhoniनं भर मैदानात मोहम्मद शमीला सुनावलं होतं
कोरोना व्हायरसच्या संकटात पाकिस्तानवरील कर्जाचं ओझंही वाढत चाललं आहे आणि त्यासाठी पाकिस्तानी जनतेनंच मदत करावी असं आवाहन पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी केलं आहे. त्यांनी तर थेट पाकिस्तानात आणि परदेशात राहणाऱ्या पाक नागरिकांकडे भीक मागितली आहे. त्यासाठी मियाँदाद यांनी बँक अकाऊंट खुलं केलं असून त्यात पैसे पाठवण्याचं आवाहन केलं होतं. या पैशातून इंटरनॅशनल मॉनेटरी फंडाकडून घेतलेलं कर्ज फेडणार असल्याचं मियाँदाद यांनी व्हिडीओतून सांगितले आहे.
मियाँदाद यांनी म्हटलं की,''आतापर्यंत पाकिस्तानला अनेकांनी लुटलं. त्यात भ्रष्टाचारी पाकिस्तानींचाही समावेश आहे. त्यांनाही मी मदत करण्याचं आवाहन करतो. मी तुमच्यासमोर भीक मागतोय, पण स्वतःसाठी नाही, तर देशासाठी. मी लवकरच नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानमध्ये एक खातं उघडणार आहे आणि त्यात लोकांनी पैसा जमा करावा.
पाहा व्हिडीओ...
अन्य महत्त्वाच्या बातम्या
ऑल टाईम IPL संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे; ऑस्ट्रेलियन खेळाडूनं निवडला संघ
कॅटरीना कैफच्या लाईव्ह चॅटमध्ये Yuzvendra Chahalची एन्ट्री, केलं असं काहीतरी
ऑस्ट्रेलियन फलंदाज David Warnerला भारतीय दिग्दर्शकाकडून चित्रपटाची ऑफर!
धक्कादायक : 89 चेंडूंत द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूवर सहा वर्षांची बंदी
महाराष्ट्र पोलिसांप्रति Sachin Tendulkarनं व्यक्त केली कृतज्ञता; मानले आभार
टीम इंडियाच्या शिलेदारांचे बालपणीचे फोटो; बघा तुम्हाला ओळखता येतात का?
IPL 2020च्या आयोजनासाठी UAEकडून प्रस्ताव? BCCI कडून अपडेट