Jos Buttler Catch Video Shikhar Dhawan, IPL 2022 PBKS vs RR Live: पंजाबच्या संघाने राजस्थान विरूद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दुपारच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करून मोठे आव्हान देण्याचा मानस कर्णधार मयंक अग्रवालने जाहीर केला. त्यानुसार शिखर धवन-जॉनी बेअरस्टो जोडीने दमदार सुरूवातदेखील केली होती. पण पॉवर-प्लेच्या बंधनांचा फायदा घेण्याच्या प्रयत्नांत शिखर धवन लवकर बाद झाला. जॉस बटलरने अश्विनच्या गोलंदाजीवर त्याचा अप्रतिम झेल टिपला.
पहिल्या ५ षटकात पंजाबने संयमी फलंदाजी केली होती. त्यामुळे पॉवर प्ले च्या शेवटच्या षटकात फटकेबाजी केली जाईल, अशी अपेक्षा होतीच. अशा वेळी संजू सॅमसनने अश्विनला गोलंदाजी दिली. अश्विनने चतुरपणे धवनला अंगाच्या जवळ गोलंदाजी केली. या चेंडूला मारण्यासाठी धवनला झटपट फटका शोधता आला नाही. त्याने चेंडू ३० यार्डच्या सर्कल वरून मारण्याचा विचार केला, पण तो विचार फसला. चेंडू हवेत जाताच बटलर वेगाने मागच्या दिशेने धावत गेला. त्याने चेंडूचा अंदाज घेतला आणि हवेत उडी मारून झेल टिपला. झेल टिपल्यानंतरही त्याने एक कोलांटी उडी मारत स्वत:ला सावरले, पण झेल सुटू दिला नाही. त्यामुळे शिखर धवन १२ धावा काढून माघारी परतला.
बटलरने टिपलेला अप्रतिम झेल, पाहा Video-
दरम्यान, राजस्थानच्या संघाने आजच्या सामन्यासाठी संघात यशस्वी जैस्वालला संघात स्थान दिले. पाहूया दोन्ही संघातील खेळाडू-
राजस्थान रॉयल्स :जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार व किपर), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसीद कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन
पंजाब किंग्ज : जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, मयंक अग्रवाल (कर्णधार), भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (किपर), रिषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा