रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पुन्हा एकदा मुंबईनं शरणागती पत्करलेली पाहायला मिळाली. कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात मुंबईला पहिल्या डावात केवळ 194 धावा करता आल्या. दुसरीकडे पंजाब विरुद्ध दिल्ली या सामन्यात शुबमन गिलनं पंचांना थेट शिव्या घातल्या. आणखी एका सामन्यात काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग घडला. जलदगती गोलंदाजानं टाकलेला चेंडू थेट फलंदाजाच्या हेल्मेटमध्ये घुसला... त्यानंतर तात्काळ फिजिओंना मैदानावर धाव घ्यावी लागली.
टीम इंडियाच्या फलंदाजाचा बालहट्ट; पंचांचीही पलटी अन् प्रतिस्पर्ध्यांची मैदानातून कलटी
केरळ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यात हा प्रसंग घडला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला मैदानावर उतरलेल्या केरळला 16 धावांत दोन धक्के बसले. राहुल पी ( 0) आणि रोहन प्रेम ( 0) यांना खातेही उघडता आले नाही. जलाज सक्सेना ( 10) आणि रॉबीन उथप्पा ( 9) हेही स्वस्तात माघारी परतले. त्यामुळे केरळची अवस्था 4 बाद 32 अशी दयनीय झाली आहे.
या सामन्याच्या 10व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सर्वांचा काळजाचा ठोका चुकला. रवी किरणने टाकलेला चेंडू डावखुऱ्या रोहन प्रेम याच्या हेल्मेटमध्येच शिरला. त्यानंतर सर्व खेळाडूंनी रोहनच्या दिशेनं धाव घेतली. पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा...
Web Title: Video: Kerala batsman Rohan Prem hit hard; Ball inside the helmet, physio on the ground
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.