नवी दिल्ली - श्रीलंकेच्या डीसिल्व्हा आणि रोशन सिल्व्हा यांनी शेवटच्या दिवशी टिच्चून फलंदाजी करत तिसऱ्या कसोटी सामन्यातील पराभव टाळला. भारतानं श्रीलंकेसमोर विजयासाठी 410 धावांचे आव्हान ठेवलं होतं. त्यात सामन्याच्या चौथ्या दिवशी लंकेनं तीन विकेट गमावल्या होत्या त्यामुळे पाचव्या दिवशी त्यांच्यावर पराभवाचं सावट उभं राहिलं होतं. भारत दुसऱ्याच सत्रात सामना जिंकेल अशी अवस्था असतानाच सामना अनिर्णीत राहिला. चौथ्या डावात डीसिल्व्हानं केलेलं शतक आणि रोशन सिल्व्हाच्या 74 धावांच्या बळावर लंकेनं आपला पराभव टाळला.
तिसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारतीय कर्णधार विराट कोहलीनं डीसिल्व्हा आणि रोशन सिल्व्हा यांना बाद करण्यासाठी गोलंदाजीमध्ये अनेक बदल केले. त्यांच्या संयमी आणि चिवट फलंदाजीसमोर भारताचे गोलंदाज अपयशी ठरत होते. लंकेच्या जम बसलेल्या फलंदाजांना बाद करण्यासाठी कोहलीनं अनेक प्रयत्न केलं पण त्यामध्ये त्याला यश आले नाही. शेवटी विराट कोहलीनं शक्कल लढवत पब्लिकचा सपोर्टही घेतला. कोहलीची हा डावही लंकेच्या फलंदाजांनी हाणून पाडला.
कोहली, रहाणे आणि पुजारा स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होते. त्यावेळी विराट कोहलीनं लंकेच्या फलंदाजांचा सयम मोडण्यासाठी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. कोहलीसह रहाणे आणि पुजारा यांनी जोर-जोरात टाळ्यावाजवण्यास सुरुवात केली. त्यांच्या सुरात सुर मिसळून सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनीही टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. स्टेडियममध्ये टाळ्यांचा आवाज घुमत होता.
सेट झालेले लंकेचे फलंदाज दबावात येऊन बाद व्हावे म्हणून कोहलीनं आखलेला हा एक डाव होता. त्याला प्रेषकांनी साथ दिली. त्यात इशांत शर्मानं जोश भरत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत कर्णधाराला साथ दिली. पण...कोहलीनं आखलेल्या या चक्रव्हीवमध्ये लंकेच्या फलंदाजांनी न अडकता संयमानी फलंदाजी करत पराभव टाळला. शेवटी दोन्ही कर्णधारांच्या सहमती नंतर पंचानं सामना अनिर्णीत घोषित केला. तीन कसोटी सामन्याची मालिका भारतानं 1-0 च्या फरकानं जिंकली. विराट कोहलीला सामनाविर आणि मालिकाविर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा -
धावफलक
भारत पहिला डाव :
७ बाद ५३६ वर घोषित, श्रीलंका पहिला डाव: ३७३ धावा, भारत दुसरा डाव : ५ बाद २४६ वर घोषित.
श्रीलंका दुसरा डाव : दिमुथ करुणारत्ने झे. ससाहा गो. जडेजा १३, सदीरा समरविक्रम झे. रहाणे गो. शमी ५, धनंजय डीसिल्व्हा निवृत्त ११९, सुरंगा लकमल त्रि. गो. जडेजा ००, अँजेलो मॅथ्यूज झे. रहाणे गो. जडेजा १, दिनेश चंडीमल त्रि. गो. आश्विन ३६, रोशन सिल्व्हा नाबाद ७४, निरोशन डिकवेला नाबाद ४४, अवांतर ७, एकूण १०३ षटकांत ५ बाद २९९ धावा. गोलंदाजी: ईशांत १३-२-३२-०, शमी १५-६-५०-१, आश्विन ३५-३-१२६-१, जडेजा १-०-३-०, विजय १-०-३-०, कोहली १-०-१-०.
Web Title: VIDEO: In the last minute, Kohli did something that did not get wickets ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.