जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 20 लाखांच्यावर गेली आहे. त्यापैकी 1 लाख 26,776 लोकांना प्राण गमवावे लागले, तर 4 लाख 84,781 जणं बरे झाले आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 11,555 इतका झाला आहे. त्यापैकी 396 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1362 जणं बरे झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला आहे. पण, अजूनही अनेक ठिकाणी लोकं नियमांचं पालन करताना दिसत नाही. अशा लोकांना टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आवाहन केलं आहे. कोरोना व्हायरसला पराभूत करून मानवतेचा वर्ल्ड कप जिंकूया, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
रवी शास्त्रींवर बॉलिवूड अभिनेत्रीचं होतं अफाट प्रेम; एका मस्करीनं तुटलं नातं?शास्त्रींनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला आणि त्यात त्यांनी आवाहन केलं आहे. ते म्हणाले,'' कोरोना व्हायरसचा पराभव करणे हे वर्ल्ड कप चषकाचा पाठलाग करण्यासारखे आहे. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आपण सर्वस्व पणाला लावतो. त्यामुळे तुमच्या समोर उभा आहे, तुमच्याकडे जो नजर वटारून पाहत आहे, तो साधा वर्ल्ड कप नाही. या वर्ल्ड कप जिंकण्यासाठी केवळ 11 खेळाडू मैदानावर नाहीत, तर 130 कोटी लोकं संघर्ष करत आहेत.''
त्यांनी पुढे सांगितलं की,''ही लढाई सोपी नक्कीच नाही, परंतु कोरोनाला हरवण्यासाठी तुम्हाला संकटांचा सामना करावा लागेल. चला मग सर्वांना एकत्र येऊन सामना करूया.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
वांद्रे स्थानक गर्दी प्रकरण; Hardik Pandya, Harbhajan Singh यांनी व्यक्त केली चिंता
Shoaib Akhtar सुधरणार नाही; भारत-पाकिस्तान मालिकेवरून पुन्हा बरळला!
BCCI बेभरवशी, पाकिस्तान क्रिकेटला भारताची गरज नाही; PCB अध्यक्षांची टीका