Video : ऐका सचिन काय सांगतोय; कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना समाजापासून दूर करू नका, पण... 

महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं शुक्रवारी कोरोना व्हायरसशी मुकाबला करणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारला प्रत्येकी 25 लाखांची मदत करून समाजकार्य केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 03:15 PM2020-03-27T15:15:29+5:302020-03-27T15:16:57+5:30

whatsapp join usJoin us
Video: Listen to what Sachin Tendulkar is saying; Don't boycott corona-positive patients from the community svg | Video : ऐका सचिन काय सांगतोय; कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना समाजापासून दूर करू नका, पण... 

Video : ऐका सचिन काय सांगतोय; कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना समाजापासून दूर करू नका, पण... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं शुक्रवारी कोरोना व्हायरसशी मुकाबला करणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारला प्रत्येकी 25 लाखांची मदत करून समाजकार्य केले. या मदतीनंतर त्याचं सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी सचिननं वारंवार सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून लोकांना सूचना कम आवाहन केलं आहे. शुक्रवारी त्यानं आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला, त्यात त्यानं कोरोना पोझिटिव्ह रुग्णांना समाजापासून दूर ठेवू नका, असं आवाहन केलं आहे.

तो म्हणाला,''एक समाज म्हणून आपली एक जबाबदारी आहे. कोरोना पॉझिटिव्ह लोकांना आपलं प्रेम मिळणं गरजेचं आहे. कोरोना झाल्याची लाज त्यांना वाटू देऊ नका. सुरक्षिततेची सर्व काळजी घ्या. त्यांच्यापासून दुरावा ठेवा, परंतु त्यांना समाजातून दूर करू नका. कोरोना व्हायरसविरुद्धची ही लढाई आपण एकमेकांना सहकार्य करून जिंकू शकतो.''

पाहा व्हिडीओ...


अन्य महत्त्वाच्या बातम्या
 

सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीला मिळाली कलाटणी; अझरुद्दीननं सांगितली पडद्यामागची गोष्ट

UEFA Champions Leagueच्या फुटबॉल सामन्यामुळे इटलीत पसरला महाभयंकर Corona Virus? 

Big Breaking : सचिन तेंडुलकरची राज्य अन् केंद्र सरकारला लाखोंची मदत 

लाखमोलाची मदत; पुण्यातील रोजंदारी कामगारांना MS Dhoniचं आर्थिक सहाय्य

'गोल्डन गर्ल' Hima Dasचा पुढाकार; राज्य सरकारला दिला एका महिन्याचा पगार

Sachin Tendulkarच्या नावानं पैसे गोळा करतोय न्यूझीलंडचा गोलंदाज; पण का?

Web Title: Video: Listen to what Sachin Tendulkar is saying; Don't boycott corona-positive patients from the community svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.