ठळक मुद्देमहेंद्रसिंग धोनीनेही आपली मुलगी झिवासोबत ख्रिसमस साजरा केलामहेंद्रसिंग धोनी आणि झिवाचा मस्ती करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
मुंबई - ख्रिसमसच्या निमित्ताने अनेकांनी आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत मिळून दिवस साजरा केला. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही आपली मुलगी झिवासोबत ख्रिसमस साजरा केला. रविवारी भारत आणि श्रीलंकेदरम्यान पार पडलेल्या शेवटच्या टी-20 सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनी आपल्या घरी पोहोचला. यावेळी त्याने आपली मुलगी झिवासोबत ख्रिसमस साजरा केला. महेंद्रसिंग धोनी आणि झिवाचा मस्ती करतानाचा व्हिडीओ समोर आला असून एमएस धोनी फॅन्स या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत धोनी आणि झिवा एका कारमध्ये बसलेले दिसत आहेत.
धोनीच्या मांडीवर बसलेली झिवा यावेळी गाणं गाताना दिसत आहे. झिवा 'वी विश यू अ मेरी ख्रिसमस’ गात असताना धोनी आपल्या लेकीकडे कौतुकाने पाहताना दिसत आहेत. या व्हिडीओत झिवाचा चेहरा दिसत नाहीये, पण तिला गाताना ऐकू येत आहे. धोनीच्या चाहत्यांना आणि ट्विटरकरांना हा व्हिडीओ प्रचंड आवडत असून, अनेकजण शेअर करत आहेत.
सध्या भारतीय संघ अत्यंत आनंदात आहे. वानखेडे मैदानात रंगलेल्या अखेरच्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर मात करत मालिका 3-0 च्या फरकाने जिंकली आहे. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी संयमी खेळ करत विजय संपादन केला. लंकेविरोधातील विजयानंतर भारतीय संघानं ख्रिसमस सेलिब्रेशन केलं. यामध्ये माजी कर्णधार एम.एस धोनी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. धोनी या सेलिब्रेशनमध्ये चक्क संता झाला होता. याचा व्हीडीओ बीसीसीआयनं पोस्ट केला आहे.
नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला भारतीय संघानं लंकेचा फडशा पाडला. भारतानं अखेरचा सामना पाच विकेटनं जिंकला. त्यानंतर पुरस्कार वितरनाच्या कार्यक्रमावेळी भारतीय खेळाडू संताक्लॉजच्या टोप्या घालून मैदानात अवतरले होते. विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी संघातील काही खेळाडू धोनीला संतासारखी दाढीवाली टोपी घातली होती. त्यानंतर संघातील खेळाडूनी धोनीसोबत सेल्फीही घेतल्या. यामध्ये सर्वच नवख्या खेळाडूंचा समावेश होता. दरम्यान, तिसऱ्या टी-20 सामन्याद्वारे भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरच्या हातात विजयी ट्रॉफी देण्यात आली होती.
Web Title: VIDEO: Mahendra Singh Dhoni celebrated Christmas with daughter Ziva
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.