Join us  

Video: महेंद्रसिंग धोनीची नॅनो सेकंदातील स्टम्पिंग पाहिलीत का? 

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला फलंदाजीत साजेशी कामगिरी करता येत नसली तरी यष्टिमागे त्याचा खेळ उल्लेखनीय होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 1:08 PM

Open in App

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला फलंदाजीत साजेशी कामगिरी करता येत नसली तरी यष्टिमागे त्याचा खेळ उल्लेखनीय होत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वन डे सामन्यात त्याच्या यष्टिमागच्या कमगिरीने लोकांची मनं जिंकली आहे. त्याने 0.08 नॅनो सेकंदात विंडीजच्या फलंदाजाला यष्टिचीत केले आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या चौथ्या सामन्याच्या 28व्या षटकात रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर धोनीची ही चपळता पाहायला मिळाली. त्याने किमो पॉलला यष्टिचीत केले आणि दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाऊचरच्या विक्रमाशी बरोबरी केली. धोनीचा वन डेतील हा 424 वा बळी होता. त्याने 331 सामन्यांत 309 झेल आणि 115 स्टम्पिंग केले आहेत. सर्वाधिक बळी टिपणाऱ्या यष्टिरक्षकांमध्ये ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट (472) आणि श्रीलंका कुमार संगकारा (482) हे आघाडीवर आहेत.  धोनीने पुण्याच्या सामन्यात यष्टिमागे अप्रतिम झेल टिपून चाहत्यांना खूश केले होते.  

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज