Join us

Video : फिल्डिंग करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाची पँट घसरली अन्... 

ऑस्ट्रेलियात सध्या सुरू असलेल्या मार्श चषक वन डे क्रिकेट स्पर्धेत रविवारी खळखळून मनोरंजन करणारा प्रसंग घडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 10:03 IST

Open in App

ऑस्ट्रेलियात सध्या सुरू असलेल्या मार्श चषक वन डे क्रिकेट स्पर्धेत रविवारी खळखळून मनोरंजन करणारा प्रसंग घडला. अॅशेस मालिकेत खोऱ्यानं धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुश्चॅग्नेसोबत हा प्रसंग घडला. फिल्डिंग करताना त्याची पँटच घसरली आणि त्यानंतर त्यानं जे केलं ते पाहण्यासारखं होतं. मार्नस हा क्विन्सलँड संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.

व्हिक्टोरीया संघाविरुद्धच्या सामन्यात मार्नसने आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांची वाहवाह मिळवली. सामन्याच्या 29व्या षटकात विल सदरलँडने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मार्नसने डाईव्ह मारून तो चेंडू अडवला, परंतु तसे करत असताना त्याची पँट घसरली, तरीही त्यानं चेंडू त्वरीत यष्टिरक्षकाकडे थ्रो केला आणि ख्रिस ट्रेमेनला धावबाद केले.

पाहा व्हिडीओ 

या सामन्यात उस्मान ख्वाजानं क्विन्सलँडसाठी 126 चेंडूंत 138 धावांची खेळी केली. त्यात 16 चौकार व एका षटकाराचा समावेश होता. त्याने सलामीवीर सॅम हिझलेट ( 88) याच्यासह पहिल्या विकेटसाठी 185 धावांची भागीदारी केली. पण, मधल्या फळीला अपयश आले. त्यांना 9 बाद 322 धावांवर समाधान मानावे लागले. मार्नसने 25 चेंडूंत 36 धावा चोपल्या. जेम्स पॅटीन्सनने 3 विकेट्स घेतल्या.  

लक्ष्याचा पाठलाग करताना अॅरोन फिंच ( 46) आणि विल सदरलँड ( 66) वगळता व्हिक्टोरीयाच्या एकाही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मार्क स्टेकेली ( 4/25),  मिचेल नेसर ( 2/26) आणि बेन कटींग ( 2/40) यांनी क्विन्सलँडकडून उत्तम गोलंदाजी केली. 

टॅग्स :आॅस्ट्रेलिया