Join us  

Video : राजस्थान रॉयल्सनं संघात घेतला अन् पठ्ठा R Ashwin ची कॉपी करायला गेला अन् वाद ओढवून घेतला

IPL 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सने दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ॲडम झम्पा ( Adam Zampa) याला आपल्या ताफ्यात घेतले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 4:25 PM

Open in App

IPL 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सने दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ॲडम झम्पा ( Adam Zampa) याला आपल्या ताफ्यात घेतले. कोरोना काळात झम्पाने अचानक आयपीएल खेळण्यास नकार दिला होता आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला त्याचा फटका बसला होता. अशा परिस्थितीत आयपीएल २०२३च्या मिनी ऑक्शनमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात झम्पावर कोणत्याच फ्रँचायझीनी बोली लावली नव्हती, परंतु अखेरच्या टप्प्यात RR ने त्याला मुळ किमतीत आपलेसे केले. आता झम्पा, युझवेंद्र चहल आणि आर अश्विन हे दमदार फिरकीपटू सोबत खेळताना दिसणार आहेत. अशात RR मध्ये दाखल झालेल्या झम्पाने R Ashwin ची कॉपी करण्यास सुरुवात केली आहे.

मोठी बातमी : सौरव गांगुलीच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी; IPL फ्रँचायझीची जबरदस्त खेळी

बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्स (  Melbourne Stars ) संघाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या झम्पाने मेलबर्न रेनेगॅड्स ( Melbourne Renegades ) संघाविरुद्ध 'मंकडिग' ( आयसीसीने हे वाक्य बाद केले आहे) करण्याचा प्रयत्न केला. पण, तिसऱ्या अम्पायरने नाबाद दिल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला अन् सोशल मीडियावर नियमावरून नवा वाद सुरू झाला. रेनेगॅड्सच्या ७ बाद १४१ धावांचा पाठलाग करताना स्टार्सचा निम्मा संघ ५७ धावांत माघारी परतला आहे. राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरोन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रियान पराग, ओबेड मॅकॉय, ध्रुव जुरेल, नवदीप सैनी, केसी चरिअप्पा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप सेन, जेसन होल्डर, डोनोवल फेरेरा, कुणाल राठोड, ॲडम झम्पा, केएस आसिफ, मुरुगन अश्विन, आकाश वशिष्ट, अब्दुल पीए, जो रूट

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :बिग बॅश लीगराजस्थान रॉयल्सआर अश्विनआयपीएल २०२२
Open in App