Video : अ‍ॅशेस मालिका ; स्टीव्ह स्मिथला बाद करण्यासाठी इंग्लंडचा रडीचा डाव, पण...

स्टीव्ह स्मिथच्या सलग दुसऱ्या शतकानं इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 11:26 AM2019-08-05T11:26:19+5:302019-08-05T11:26:41+5:30

whatsapp join usJoin us
Video : Moeen Ali's brought the game into disrepute; unpredictable bouncer for Steve Smith in Ashes 2019 | Video : अ‍ॅशेस मालिका ; स्टीव्ह स्मिथला बाद करण्यासाठी इंग्लंडचा रडीचा डाव, पण...

Video : अ‍ॅशेस मालिका ; स्टीव्ह स्मिथला बाद करण्यासाठी इंग्लंडचा रडीचा डाव, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बर्मिंगहॅम, अ‍ॅशेस मालिका : स्टीव्ह स्मिथच्या सलग दुसऱ्या शतकानं इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणले आहे. ऑस्ट्रेलियानं यजमान इंग्लंडसमोर विजयासाठी 398 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 7 बाद 487 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर बिनबाद 13 धावा केल्या आहेत. त्यांना अखेरच्या दिवशी विजयासाठी 385 धावा कराव्या लागणार आहेत. या सामन्यात स्मिथ आणि मॅथ्यू वेड या जोडीनं इंग्लंडच्या नाकी नऊ आणले. त्यामुळे स्मिथला रोखण्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंनी रडीचा डाव खेळल्याचे पाहायला मिळाले.

अ‍ॅशेस मालिका : स्टीव्ह स्मिथचे सलग दुसरे शतक, कोहलीसह अनेक दिग्गजांना टाकलं मागे

पहिल्या डावात 8 बाद 122 धावांवरून स्मिथनं ऑस्ट्रेलियाला 284 धावांपर्यंत मजल मारून दिली. पहिल्या डावात स्मिथनं 219 चेंडूंत 16 चौकार व 2 षटकार खेचून 144 धावा केल्या. दुसऱ्या डावातही स्मिथची धावांची भूक कायम दिसली. इंग्लंडच्या पहिल्या डावातील 90 धावांची आघाडीचा पाठलाग करताना दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे तीन फलंदाज 75 धावांत तंबूत परतले होते. त्यानंतर स्मिथ आणि टॅ्व्हीस हेड यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या जोडीनं 130 धावांची भागीदारी करून संघाला आघाडी मिळवून दिली. पण, ही आघाडी पुरेशी नाही, याची जाण ऑस्ट्रेलियाला होती. त्याचवेळी स्मिथला रोखण्याची गरज आहे, याचीही जाण इंग्लंडला होती. म्हणून त्यांच्याकडून त्याला बाद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले.

अ‍ॅशेस कसोटी: स्मिथचे सलग दुसरे शतक, कांगारू भक्कम स्थितीत

ऑस्ट्रेलियाचा संघ 3 बाद 126 धावांवर असताना फिरकीपटू मोईन अलीनं टाकलेला चेंडू सध्या सोशलवर चर्चेत आहे. त्याच्या गोलंदाजीवर पुढे आलेल्या स्मिथला बाद करण्यासाठी अलीनं चेंडू थेट यष्टिरक्षकाच्या हातात फेकला. पण, स्मिथला बाद करण्यात ते असमर्थ ठरले. त्यानंतर स्मिथनं मॅथ्यू वेड सह 126 धावांची भागीदारी केली. स्मिथनं 207 चेंडूंत 14 चौकारांच्या मदतीनं 142 धावा केल्या. 


स्मिथनंतर वेडनं 143 चेंडूंत 17 चौकारांच्या मदतीनं 110 धावांची खेळी केली. त्याला टीम पेन ( 34), जेम्स पॅटींसन ( 47*)  आणि पॅट कमिन्स ( 26*) यांनी साथ देत संघाला 7 बाद 487 धावांपर्यंत मजल मारून दिले. ऑस्ट्रेलियानं डाव घोषित करताना इंग्लंडसमोर विजयासाठी 398 धावांचे लक्ष्य ठेवले. 

Web Title: Video : Moeen Ali's brought the game into disrepute; unpredictable bouncer for Steve Smith in Ashes 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.