कोरोना व्हायरसच्या वाढल्या प्रादुर्भाव लक्षात घेताल देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. अशात इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमावरही अनिश्चितेचं सावट आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंना घरातच रहावे लागत आहे. पण, या लॉकडाऊनच्या काळात खेळाडू आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष अजिबात करत नाहीत. भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीही त्याच्या फिटनेससाठी कसून मेहनत घेत आहे. त्यानं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात तो अनवाणी पायानं शेतात धावताना दिसत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या माजी अष्टपैलू खेळाडूचे कॅन्सरमुळे निधन
नुकताच त्यानं युजवेंद्र चहलसह इंस्टाग्राम लाईव्हवर गप्पा मारल्या होत्या. तेव्हा लॉकडाऊनच्या काळात आपण समाजसेवाही करत असल्याचं त्यानं सांगितल. त्याच्या फार्म हाऊस शेजारीच एक मजूर चक्कर येऊन पडला होता आणि शमीनं त्याला मदत केली होती. शमीनं 49 कसोटीत 180 आणि 77 वन डे सामन्यांत 144 विकेट्स घेतल्या आहेत. 11 ट्वेंटी-20 सामन्यांत त्याच्या नावावर 12 विकेट्स आहेत.
पाहा व्हिडीओ...
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Virat Kohli अन् ABD चा पुढाकार; कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी आर्थिक मदत करणार
विराट कोहली RCBची साथ सोडणार? टीम इंडियाच्या कर्णधाराचं मोठं विधान
टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी Good News: 'विराट'सेनेचा ऑगस्टमध्ये परदेश दौरा?
Kapil Dev यांनी पाकिस्तानला सुनावलं; पैशांची एवढी चणचण आहे, तर सीमेवरील दहशतवाद बंद करा!
स्टार फुटबॉलपटूच्या आईचं 22 वर्षीय बॉयफ्रेंडसोबत Break Up; कारण ऐकून बसेल धक्का
Big News : Corona Virus च्या संकटात ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची निवृत्ती