Join us  

IPL 2020: CSKचा कर्णधार MS Dhoniनं खेचले सलग पाच चेंडूंत षटकार, Video

IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमातील कामगिरीवर महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियाचे पुनरागमन अबलंबून आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 3:59 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमातील कामगिरीवर महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियाचे पुनरागमन अबलंबून आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कपनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीची चर्चा रंगल्या आहेत, परंतु आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर त्याला कमबॅक करण्याची संधी आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी तसे सांगितले आहे. त्यामुळे आयपीएलचा 13 वा मोसम गाजवण्यासाठी धोनी सज्ज झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारानं शुक्रवारी सराव सत्रात पाच चेंडूंत पाच षटकार खेचून आयपीएलपूर्वी एक ट्रेलर दाखवला.

चेन्नई सुपर किंग्सच्या सराव सत्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात 38 वर्षीय धोनीनं पाच चेंडूंत पाच खणखणीत षटकार खेचले आहेत. पण, या व्हिडीओत धोनीनं खेचलेले षटकार हे गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूवर होते की बॉल मशीनमधून टाकले जात होते, हे स्पष्ट होत नाही. चेन्नई सुपर किंग्सचा पहिलाच सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. धोनीनं आतापर्यंत 190 आयपीएल सामन्यांत 4432 धावा केल्या आहेत. त्यात 23 अर्धशतकांचा समावेश आहे. 

'माझ्या पाठीशी CSK आहे म्हणून...', MS Dhoniनं सांगितलं यशामागचं सिक्रेट!

Video : धोनीला पाहताच गळ्यात पडला सुरेश रैना, मानेवर केलं Kiss

धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत. 

IPL 2020 : Mumbai Indians चे 11 शिलेदार यंदा धुमाकूळ घालणार, सर्वांवर भारी पडणार!

 

ट्वेंटी-20त Hardik Pandyaची आणखी एक वादळी खेळी, 20 षटकारांची आतषबाजी  

IPL 2020 : Rohit Sharma म्हणतो यंदाचे जेतेपद आमचेच, सांगितलं अनोखं लॉजिक!

BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीनं नाही दिली Ravindra Jadejaला खेळण्याची परवानगी, जाणून घ्या का!

IPL 2020च्या बक्षीस रकमेतील कपात ही कॉस्ट-कटिंग नाही; BCCIनं सांगितलं खरं कारण!

विंडीजचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार Daren Sammyकडे पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षकपद

असा असावा नवरा; बायकोच्या फायनलसाठी स्टार गोलंदाजानं अर्धवट सोडला दौरा

 

टॅग्स :आयपीएल 2020महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स