जयपूर : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एका कार्यक्रमासाठी जयपूर येथे दाखल झाला. यावेळी धोनीची एक झलक पाहण्यासाठी जयपूर विमानतळावर चाहत्यांची झुंबड उडाली. धोनीचा फोटो काढण्यासाठी चाहत्यांमध्ये स्पर्धाच रंगली होती. पण, जयपूर विमानतळाबाहेर येताच धोनीच्या नव्या लूकने सर्वांना अचंबित केले. सोशल मीडियावर धोनीचा हा नवा लूक वाऱ्यासारखा व्हायरल झाला. या लूकमध्ये धोनी डोक्यावर काळा कपडा बांधलेला पाहयला मिळत आहे.
जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात पंधरा दिवस भारतीय सैन्यांसोबत पहारा देणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी घरी परतला. नवी दिल्ली विमानतळावर त्याला भेटण्यासाठी पत्नी साक्षी आणि मुलगी जिवा हे उपस्थित होते. यावेळी आपल्या लाडक्या झिवाला धोनी बिलगल्याचे पाहायला मिळाले. एका बाजूला आर्मीमध्ये पहारासाठी गेलेला धोनी मात्र जिवा भेटला तेव्हा हळवा झाल्याचे पाहायला मिळाले.
धोनी ज्या बटालियनमध्ये सहभागी होऊन पहारा देत आहे, ती बटालियन विशेष सैनिकांची आहे. धोनीला येथे दिवस आणि रात्र अशा शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. यावेळी धोनीकडे पाच किलो वजनाच्या 3 मॅग्जीन, 3 किलोचे पोशाख, 2 किलोची बूटं, 4 किलोचे 3 ते 6 ग्रेनेड, 1 किलोचे हॅल्मेट आणि 4 किलोचे बुलेटप्रुफ जॅकेट असे एकूण 19 किलो वजन असणार आहे. धोनी यावेळी 50-60 सैनिकांसोबत बंकरमध्ये राहणार आहे. 38 वर्षीय धोनी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असून, त्याच्याकडे लेफ्टनंट कर्नलपद आहे. 2011साली भारतीय लष्करानं त्याला हा मान दिला. 2015मध्ये त्यानं पॅराट्रुपरची परीक्षाही पास केली.
धोनी लवकरच राजकारणात दिसणार? 'नेतागिरी'चा फोटो झाला वायरलभारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी लवकरच राजकारण दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. कारण 'नेतागिरी' करतानाचा धोनीचा फोटो चांगलाच झाला वायरल झालेला आहे. मुख्य गोष्ट म्हणजे धोनीच्या मित्रानेच हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामुळे धोनी राजकारणात येणार, याची त्याच्या चाहत्यांना चाहुल लागली आहे.
धोनीचा बालपणीचा मित्र आणि व्यवस्थापक असलेल्या मिहिर दिवाकरने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये धोनी नेत्यांच्या लूकमध्ये दिसत आहे. हा फोटा पोस्ट केल्यावर तो वाऱ्यासारखा वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
भारतीय जनता पार्टीचे माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी, धोनी राजकारणात येणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी धोनीची भेट घेतली होती. त्यावेळी धोनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. पण धोनीने मात्र याबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.