Join us  

Video : राहुल द्रविड बनला 'इंदिरानगरचा गुंडा'; मुंबई पोलिसांचे भन्नाट ट्विट व्हायरल

दोन दिवसांपासून सोशल मीडियावर #Rahul Dravid # Indiranagar ka gunda hun main हे ट्रेंड सुरू आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 8:20 PM

Open in App

दोन दिवसांपासून सोशल मीडियावर #Rahul Dravid # Indiranagar ka gunda hun main हे ट्रेंड सुरू आहेत. जंटलमन राहुल द्रविड ( Rahul Dravid) याचा कधी न पाहिलेला अवतार सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. शांत -संयमी अशी प्रतिमा असलेल्या राहुलचा परस्परविरोधी स्वभाव एका जाहिरातीत दिसत आहे. यात राहुल द्रविड चक्क लोकांशी भांडताना, बॅटीनं गाडीची तोडफोड करताना दिसत आहे आणि त्याचा हा नवा अवतार पाहून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानंही आश्चर्य व्यक्त केलं होतं.  सामन्याआधीच दिल्ली कॅपिटल्सला धक्का, महत्त्वाचा खेळाडू दुखापतग्रस्त  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला चिडताना क्वचितच कुणी पाहिलं असेल. प्रतिस्पर्धींच्या स्लेजिंगला शब्दानं नाही, तर कामगिरीतून उत्तर द्यायचा, हा द्रविडचा साधा सोपा फंडा. त्यामुळेच जाहिरातीतील द्रविड पाहून सर्वच अवाक् झाले. मुंबई पोलिसांनी त्याच्या या जाहिरातीवरून कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करणारं ट्विट केलं आहे. ''कोरोना व्हायरस तुमच्याकडे येतोय, हे मास्क पाहतोय,''असं ट्विट मुंबई पोलिसांनी केलं आहे.   रोहित शर्मानं सामना गमावला पण मन जिंकलं; त्याच्या सामाजिक जाणीवेचे इंग्लंडच्या दिग्गजानं कौतुक केलं! राहुल द्रविडनं १६४ कसोटी सामन्यांत ५२.३१च्या  सरासरीनं ३६ शतकं व ६३ अर्धशतकांसह १३२८८ धावा केल्या आहेत. ३४४ वन डे सामन्यांत त्याच्या नावावर १०८८९ धावा आहेत आणि त्यात १२ शतकं व ८३ अर्धशतकं आहेत. 

टॅग्स :राहूल द्रविडमुंबई पोलीस