Join us  

Video : सचिन तेंडुलकरचा मास्टर स्ट्रोक; कोरोना व्हायरसला हरवण्यासाठी केला दृढ निश्चय

'कोरोना व्हायरस आलाय अन् त्याला पसरवणारी हवा आपण आहोत', सचिन तेंडुलकरची कळकळीची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 5:11 PM

Open in App

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुढील 21 दिवस देशभरात लॉकडाऊन असेल अशी घोषणा केली. तरीही लोकं घराबाहेर पडताना दिसत आहे. या सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारा व्हिडीओ महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात त्यानं लोकांना उपदेशाचे ढोस पाजले आहेत.

तो म्हणाला,''आपल्या सरकारने आणि जगभरातील वैद्यकीय एक्सपर्टनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असा सल्ला दिला आहे. पण, काही लोकांना याचं गांभीर्य कळलं नाही. मी काही व्हिडीओ पाहिले की ज्यात लोकं अजूनही बाहेर क्रिकेट खेळत आहेत. बाहेर जावं, मित्रांसोबत खेळावं असं सर्वांना वाटतं, परंतु सध्याच्या परिस्थितीत देशासाठी ते हानिकारक आहे. हे सुट्टीचे दिवस नाहीत.'' 

पाहा व्हिडीओ... 

View this post on Instagram

नमस्ते,‬ ‪हमारी सरकार ने हम सभी से ये विनती की है कि अगले २१ दिनों तक हम सब अपने घरों से ना निकलें। फिर भी बहुत लोग इस निर्देश का पालन नहीं कर रहे हैं। इस मुश्किल समय में हम सबका ये कर्तव्य है कि हम घरों में रहें और यह समय अपने परिवार के साथ बिताएं और #CoronaVirus का खात्मा करें।

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

''कोरोना व्हायरस आलाय आणि त्याला पसरवणारी हवा आपण आहोत. त्याला रोखण्याचा एकच उपाय आहे की आपण सर्वांनी घरात राहा. डॉक्टर, नर्सेस, हॉस्पिटल स्टाफ जे आपल्यासाठी लढाई करत आहेत, त्यांच्यासाठी आपण एवढं तर नक्की करू शकतो. मी आणि माझं कुटुंब दहा दिवस आपल्या मित्रांना भेटलेलो नाही आणि पुढील 21 दिवस भेटणारही नाही. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची ही संधी समजा. आपापल्या घरी राहुन तुम्ही तुमच्या कुटुंबाला, समाजाला आणि देशाला या व्हायरसपासून वाचवू शकता,'' असे आवाहन त्यानं केलं आहे. 

दरम्यान, तेंडुलकरने सर्व मराठी माणसांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला,'' आज गुढी पाडवा, मराठी नववर्षाचा पहिला दिवस. नेहमी आपण हा सण मोठ्या उत्साहाने करतो मात्र आज परिस्थिती गंभीर आहे. करोनाशी लढण्यासाठी आपण आपापल्या घरी राहण्याच्या दृढ संकल्पाची गुढी उभारुयात. लवकरात लवकर हे संकट संपेल अशी प्रार्थना करूया. गुढी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

लिओनेल मेस्सी अन् ख्रिस्तियानो रोनाल्डो यांंचा मदतीचा हात; सार्वजनिक हॉस्पिटलला कोट्यवधींची मदत

सानिया मिर्झाची समाजोपयोगी चळवळ; रोजंदारी कामगारांचे पोट भरण्याचा निर्धार

संपूर्ण देश लॉकडाऊन; आर अश्विननं जनतेला करून दिली 'त्या' प्रसंगाची आठवण

Video : शिखर धवन बनला धोबी... सायना नेहवालसह डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबीकडून सांत्वन

पंतप्रधान मोदींच्या 'त्या' घोषणेनं IPL 2020च्या आशा मावळल्या? BCCIचं महत्त्वपूर्ण विधान

वा दादा... सरकारसाठी खुलं करणार इडन गार्डन मैदान; क्वारंटाईन लोकांच्या मदतीसाठी पुढाकार  

हरभजन सिंगनं केलं शाहिद आफ्रिदीचं कौतुक; कारण जाणून तुम्हीही ठोकाल कडक सॅल्यूट

याला म्हणतात देशसेवा... बांगलादेशच्या 27 क्रिकेटपटूंनी कोरोनाशी लढण्यासाठी दिला त्यांचा पगार

टॅग्स :सचिन तेंडुलकरकोरोना वायरस बातम्या