Join us  

Video : ७ वर्षानंतर पाकिस्तानचा संघ भारतात आला, बाबर आजम भारावला; पाहा कसे झाले स्वागत 

ICC ODI World Cup 2023 : ५ ऑक्टोबरपासून भारतात होणाऱ्या ICC वर्ल्ड कप २०२३ साठी अनेक संघ आधीच भारतात आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 8:26 AM

Open in App

ICC ODI World Cup 2023 : ५ ऑक्टोबरपासून भारतात होणाऱ्या ICC वर्ल्ड कप २०२३ साठी अनेक संघ आधीच भारतात आले आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमची सेनाही ७ वर्षानंतर भारतात आली आहे. पाकिस्तानी संघाने प्रथम लाहोर ते दुबई असा प्रवास केला. दुबईहून पाकिस्तान क्रिकेट संघ आता हैदराबाद विमानतळावर दाखल झाला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाबर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी आपल्या संघासोबत आला आहे. २०१६ मध्ये पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय संघ भारतीय भूमीत उतरला होता.

बाबरच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला व्हिसा मिळण्यास विलंब झाला . त्यामुळे त्याच्या संघाला भारतात पोहोचण्यास वेळ लागला. त्यामुळे दुबईत होणारे पाकिस्तान संघाचे शिबिरही रद्द करण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट संघाने पहिल्यांदा लाहोर ते दुबई असा प्रवास केला. त्यानंतर ते दुबईहून भारतातील हैदराबाद येथे पोहोचले. जिथे २९ सप्टेंबरला पाकिस्तान संघ २०२३च्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. पण, या सामन्यासाठी चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. यानंतर पाकिस्तानचा संघ ३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. भारतीयांकडून झालेले स्वागत पाहून बाबर भारावला अन् त्याने इंस्टाग्रावर तशी पोस्ट लिहिली.  पाकिस्तान संघ ६ ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्याने वर्ल्ड कपची सुरुवात करेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. पाकिस्तानचा संघ:- बाबर आझम (कर्णधार) , शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, हसन अली, मोहम्मद वसीम जूनियर.

न्यूझीलंडचा संघही भारतात दाखल झाला आहे.   

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपपाकिस्तानबाबर आजमन्यूझीलंड