ट्वेंटी-20 फॉरमॅटमुळे क्रिकेटमध्ये वैविध्यपूर्ण फटके पाहायला मिळत आहेत. दिलस्कुल, हेलिकॉप्टर शॉर्ट्स, 360 डीग्री शॉट्स असे विविध फटक्यांचा शोध लागला तो या ट्वेंटी-20 क्रिकेटमुळेच. पण, या सर्वांनाही मागे टाकणारा फटका एका क्रिकेटपटूनं शोधून काढला आहे. त्याच्या या शैलीनं भारताच्या माजी क्रिकेटपटूलाही प्रभावित केलं आहे. त्यानं तर सोशल मीडियावर या फलंदाजाचा व्हिडीओ शेअर करून 'अद्भुत। अविश्वसनीय। अद्वितीय।' अशी प्रतिक्रिया दिली आहे. आता हा भारतीय क्रिकेटपटू कोण आणि तो अतरंगी फटका खेळणारा फलंदाज कोण जाणून घेऊया..
भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. कोणत्यातरी स्थानिक क्रिकेट सामन्याचा हा व्हिडीओ आहे. यात एक फलंदाज सुरुवातीला हेलिकॉप्टर शॉट्स मारेल असे भासवत आहे. त्यानंतर तिन्ही स्टम्प सोडून ऑफ साईडला येऊन स्कुप मारताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Video : त्यानं जे केलं ते कुणीच 'पाहिलं' नाही; बॅटिंग पार्टनर असावा तर असा!
क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही. आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेली चुक सुधारण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं केला आहे. त्यांनी चौकाराचा तो निर्णय रद्द करताना सामन्याचा निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर खेळवण्यात येईल, असा नवा नियम आयसीसीनं केला. एकीकडे आयसीसीनं नियमात बदल केली असताना सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात नक्की काय घडलं हे पाहून तुम्हालाही असा बॅटिंग पार्टनर हवा, असे वाटेल...
हा व्हिडीओ कोणत्यातरी स्थानिक क्रिकेट सामन्यातील आहे. यात फिरकीपटूच्या गोलंदाजीवर फलंदाजानं जोरदार फटका मारला, परंतु त्याचवेळी त्याचा पाय लागून स्टम्प पडला. ही बाब फलंदाजाच्या लक्षात आली, पण गोलंदाजासह यष्टिरक्षक व स्लीपमध्ये उभा असलेला खेळाडू टोलावलेल्या चेंडूकडे पाहत राहिले. त्याचवेली नॉन स्ट्राईलकला असलेल्या फलंदाजानं धाव पूर्ण करत कोणचं लक्ष जाण्यापूर्वी स्टम्प उभा केला आणि त्यावर बेल्स ठेवली. ही बाब पंचांच्या लक्षात आली की नाही याची कल्पना नाही, परंतु हा व्हिडीओ पाहून नॉन स्ट्रायकरला असा सहकारी हवा, असे नक्कीच तुम्हाला वाटेल.
Web Title: Video: No one has batted in such a bat, aakash chopra share video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.