Novak Djokovic vs Steve Smith ( Marathi News ) : नोव्हाक जोकोव्हिच आणि स्टीव्ह स्मिथ हे आपापल्या खेळातील दोन दिग्गज आज ऑस्ट्रेलियन ओपनच्या निमित्ताने एकाच कोर्टवर दिसले. यावेळी नोव्हाकने क्रिकेटवर हात आजमावले, तर स्मिथने टेनिस खेळताना जबरदस्त फोरहँड शॉट मारला. त्याचा हा रिटर्न फटका पाहून सर्व्हिस करणारा नोव्हाकही अवाक् झाला आणि त्याने ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला हॅट्स ऑफ केले.
दिग्गज टेनिसपटू नोव्हाकविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यासाठी मेलबर्न पार्क येथील कोर्टवर दिग्गज क्रिकेपटपटू स्टीव्ह स्मिथने गुरुवारी आपल्या अष्टपैलू खेळाडे दर्शन घडवले. १२ जानेवारीपासून सुरू होणार्या ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ पूर्वी दोन स्टार्समधील प्रदर्शनी टेनिस सामन्याने आयोजन करण्यात आले. नोव्हाकला ऑस्ट्रेलियन ओपनसाठी नंबर १ मानांकन मिळालेले आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धक मार्क पोलमन्स किंवा अॅलेक्सी पोपिरिन यांच्यातील विजेत्या खेळाडूविरुद्ध नोव्हाक पहिला सामना खेळेल.
नोव्हाक जोकोव्हिचने मागच्या वर्षीय अमेरिकन स्पर्धा जिंकून विक्रमी २४ वे ग्रँडस्लॅम नावावर केले होते. त्याने १०वेळा ऑस्ट्रेलियन ओपन, ३ वेळा फ्रेंच ओपन, ७ वेळा विम्बल्डन व ४ वेळा अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे. राफेल नदाल ( २२) व रॉजर फेडरर ( २०) यांचा विक्रमा त्याने मागे टाकला.