लाईट, कॅमेरा, ॲक्शन! क्रिकेटमॅचमध्ये मोठ्या स्क्रीनवर दिसताच पोरीनं गटागट संपवली बिअर अन्...

एमआय केपटाऊन सामन्यादरम्यान बिअर पिणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 02:29 PM2024-01-20T14:29:39+5:302024-01-20T14:32:35+5:30

whatsapp join usJoin us
Video of a girl was seen chugging a glass of beer in one large gulp video went viral on internet | लाईट, कॅमेरा, ॲक्शन! क्रिकेटमॅचमध्ये मोठ्या स्क्रीनवर दिसताच पोरीनं गटागट संपवली बिअर अन्...

लाईट, कॅमेरा, ॲक्शन! क्रिकेटमॅचमध्ये मोठ्या स्क्रीनवर दिसताच पोरीनं गटागट संपवली बिअर अन्...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Video Video : न्यूलँड्स येथे एमआय केपटाऊन आणि पर्ल रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुंबई इंडियन्सच्या मालकीच्या दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगला नुकतीच सुरुवात झाली आहे. आगामी SAT20 लीगसाठी MI Cape Town संघाचे नेतृत्व किरॉन पोलार्डकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना आता झटपट क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय. शुक्रवारी झालेल्या या सामन्यात एमआय केपटाऊन संघाने न्यूलँड्स येथे पर्ल रॉयल्सचा आठ विकेट्सने पराभव केला. पण या लक्षवेधी सामन्याऐवजी एका तरुणीची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. 

अलीकडेच सोशल मीडियावर MI Cape Town आणि पर्ल रॉयल्स या दोन संघामधील सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. मैदानावर सामना चालू असताना एका तरुणीने केलेलं कृत्याचा व्हिडीओ कॅमेरामध्ये कैद झाला. या व्हायरल  व्हिडिओमध्ये, एक मुलगी चक्क बिअर पिताना दिसते. एका दमात सिप मारत ही तरुणी बिअरचा अख्खा ग्लास संपवते. तिची ही कामगिरी पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हातच लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  

पाहा व्हिडीओ - 

दरम्यान, एक्सवर शेअर करण्यात आलेल्या या व्हायरल व्हिडीओवर काही लोकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. 'ती स्वत: ला डिहायड्रेट करत आहे' अशी गंमतीदार प्रतिक्रिया एका यूजरने दिलीय. शिवाय बिअरने भरलेला अर्धा ग्लास भरलेला असताना तिने तो गटागट पित संपवला. या तरुणीचा विचित्र पराक्रम पाहून नेटकऱ्यांमध्ये एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळत आहे.  

Web Title: Video of a girl was seen chugging a glass of beer in one large gulp video went viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.