Join us  

Cheteshwar Pujara Video: एकदम गजब! चेतेश्वर पुजारा झाला लेग-स्पिनर; चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का

पुजाराच्या गोलंदाजीचा व्हिडीओ संघाने ट्वीटर अकाऊंटवरही पोस्ट केला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 7:52 PM

Open in App

Cheteshwar Pujara Leg Spin Bowling Video: भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे. या संघाचा भाग नसलेले अनेक खेळाडू सध्या काउंटी क्रिकेटही खेळत आहेत. टीम इंडियाच्या कसोटी संघाचा भाग असलेला चेतेश्वर पुजारा ससेक्स संघाकडून काऊंटी क्रिकेट खेळत आहे. संयमी आणि शिस्तबद्ध फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या टीम इंडियाच्या चेतेश्वर पुजाराने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आतापर्यंत टीम इंडियाकडून फारसा गोलंदाजी न करणाऱ्या पुजाराने चक्क लेग-स्पीन गोलंदाजी केली आणि महत्त्वाचे म्हणजे त्याने अचूक गोलंदाजी केली.

पुजाराने आपल्या गोलंदाजीने चाहत्यांना आश्चर्यचकित केले. चेतेश्वर पुजाराने ससेक्ससाठी एक षटक टाकले. त्या षटकात त्याने ८ धावा दिल्या. पण बळी मात्र त्याला घेता आला नाही. ससेक्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट केले. त्या ट्वीटमध्ये चेतेश्वर पुजाराची पूर्ण ओव्हर झटपट दाखवण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये चेतेश्वर पुजारा लेग स्पिन टाकत आहे आणि त्याचा चेंडूही चांगला फिरत देखील आहे. हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिल्याचेही दिसत आहे. पाहा व्हिडीओ-

चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त एकच षटक टाकले आहे. आतापर्यंत ९६ कसोटी सामने खेळलेल्या चेतेश्वर पुजाराने एका षटकांत २ धावा दिल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये थोडीफार गोलंदाजी केली आहे आणि त्याच्या नावावर ६ विकेट्स आहेत. काऊंटी क्रिकेटच्या या मोसमात चेतेश्वर पुजाराने चांगली कामगिरी केली आहे. चेतेश्वर पुजाराने या काऊंटीमध्ये दुहेरी शतकासह चार शतके झळकावली. इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीत चेतेश्वर पुजाराने पहिल्या डावात १३ धावा आणि दुसऱ्या डावात ६६ धावा केल्या होत्या.

टॅग्स :कौंटी चॅम्पियनशिपचेतेश्वर पुजाराभारतीय क्रिकेट संघसोशल मीडिया
Open in App