Join us  

Jasprit Bumrah Yorker, IPL 2022 MI vs PBKS Video: खतरनाक यॉर्कर!! जसप्रीत बुमराहच्या वेगवाग चेंडूने उडवली लिव्हिंगस्टोनची दांडी

फलंदाजाने बॅट फिरवण्याआधीच चेंडूने घेतला स्टंपचा वेध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 10:14 PM

Open in App

Jasprit Bumrah Yorker, IPL 2022 MI vs PBKS Video: पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) गोलंदाजांची प्रथम फलंदाजी करताना तुफान धुलाई केली. कर्णधार मयंक अग्रवाल, सलामीवीर शिखर धवन यांची अर्धशतके आणि युवा फलंदाज जितेश शर्माची फटकेबाजी याच्या बळावर पंजाबने मुंबईला १९९ धावांचे आव्हान दिले. पहिल्या डावात बुमराहच्या खरतनाक यॉर्करची चांगलीच चर्चा रंगल्याचं दिसले. पंजाबचा संघ वेगाने धाव करत असल्याने जसप्रीत बुमराहला धावगती रोखण्यासाठी गोलंदाजी देण्यात आली. त्यावेळी फॉर्मात असलेला लियम लिव्हिंगस्टोन नुकताच मैदानात आला होता. गेल्या दोन्ही सामन्यात अर्धशतक ठोकल्यामुळे मुंबईला त्याच्यापासून जास्तीचा धोका होता. पण बुमराहने षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अतिशय खतरनाक यॉर्कर टाकत त्याची दांडी गुल केली.

दरम्यान, पंजाबच्या सलामीवीरांनी मुंबईला चोपून काढले. कर्णधार मयंक अग्रवालने ३२ चेंडूत ५२ तर शिखर धवनने ५० चेंडूत ६० धावांची शानदार खेळी केली. जॉनी बेअरस्टो १२ तर लियम लिव्हिंगस्टोन २ धावांवर बाद झाले. शेवटी जितेश शर्माने नाबाद ३० धावांची खेळी करत संघाला १९८ पर्यंत मजल मारून दिली.

मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (किपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थंपी

पंजाब किंग्ज संघ: मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो (किपर), लियम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग

टॅग्स :आयपीएल २०२२जसप्रित बुमराहमुंबई इंडियन्सनीता अंबानी
Open in App