Join us  

Joe Root reverse sweep Video: जो रूटचा शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर 'रिव्हर्स स्वीप'; स्पिनरसारखं चोपून काढलं...

टीम इंडियाचा इंग्लंडने ७ गडी राखून केला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 5:43 PM

Open in App

Ind Vs Eng 5th test : जो रूट ( Joe Root) आणि जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने मालिकेतील पाचवी कसोटी ७ गडी राखून जिंकली आणि मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. बिनबाद १०७ वरून ३ बाद १०९ अशी अवस्था असताना रूट-बेअरस्टो जोडीने मैदान गाजवलं. भारताच्या वेगवान गोलंदाजांनाही स्पिनर्सप्रमाणे फटकेबाजी करत या दोघांनी संघाला विजय मिळवून दिला.

भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ४१६ धावा केल्या. यानंतर इंग्लंडचा संघ २८४ धावांवर बाद झाला. त्यावेळी भारताने १३२ धावांची आघाडी घेतली. पण दुसऱ्या डावात भारतीय संघ २४५ धावांत बाद झाला आणि इंग्लंडला ३७८ धावांचे लक्ष्य मिळाले. इंग्लिश फलंदाजांनी चौथ्या आणि पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांची प्रचंड धुलाई केली. शार्दूल ठाकूरसारख्या वेगवान गोलंदाजाला जो रूटने स्पिनरप्रमाणे उभ्या उभ्या जागेवरून रिव्हर्स स्वीप फटका मारला. त्याच्या या फटक्याचे विशेष कौतुक केले जात आहे. पाहा तो फटका--

रूट-बेअरस्टो जोडीने मिळून ३१६ चेंडूंत २६९ धावांची नाबाद भागीदारी करताना इंग्लंडला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. एजबॅस्टन कसोटीत आतापर्यंत २८४ धावांचा यशस्वी पाठलाग करता आला होता. पण आज इंग्लंडने ३७८ धावांचे आव्हान पार केले आणि नवा इतिहास रचला. इंग्लंडने केवळ ३ गडी गमावत हा पराक्रम करून दाखवला. पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सुटल्याने भारताचे २००७ नंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न अद्यापही अपूर्णच राहिले.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजो रूटशार्दुल ठाकूरभारतीय क्रिकेट संघ
Open in App